• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

June 22, 2026 by admin Leave a Comment


'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे.

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता गुरू दिवेकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरूच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे.

गुरू दिवेकरच्या बहिणीचं निधन झालं आहे. जुईली असं त्याच्या बहिणीचं नाव असून तिच्यासोबतच्या आठवणी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट सकाळ...' अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. 18 जून रोजी गुरूच्या बहिणीचं निधन झालं.

गुरू दिवेकरच्या बहिणीचं निधन झालं आहे. जुईली असं त्याच्या बहिणीचं नाव असून तिच्यासोबतच्या आठवणी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट सकाळ…' अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. 18 जून रोजी गुरूच्या बहिणीचं निधन झालं.

या पोस्टमध्ये गुरूने लिहिलं 'माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ.. 18 जून 2026 ची ती सकाळ. मला फोन आला की तुझी जुईली ताई गेली. माझी अत्यंत लाडकी बहीण जुईली - 'जुया' आम्हाला सोडून गेली. हा खूप मोठा धक्का होता. मला सुरुवातीला त्यावर विश्वासच बसत नव्हता.'

या पोस्टमध्ये गुरूने लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ.. 18 जून 2026 ची ती सकाळ. मला फोन आला की, तुझी जुईली ताई गेली. माझी अत्यंत लाडकी बहीण जुईली – 'जुया' आम्हाला सोडून गेली. हा खूप मोठा धक्का होता. मला सुरुवातीला त्यावर विश्वासच बसत नव्हता.'

'मी मन धीट करून हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे मला तिला बघायचं धाडसच होत नव्हतं. सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर दाटून येत होत्या. हे सगळं एकाच वेळी सहन करणं खूप कठीण जात होतं. माझी बहीण दिसायला जरी नाजूक असली तरी तिचं मन कणखर होतं. तिने शक्य तितका लढा दिला होता' असं त्याने पुढे लिहिलं.

'मी मन धीट करून हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिथे मला तिला बघायचं धाडसच होत नव्हतं. सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर दाटून येत होत्या. हे सगळं एकाच वेळी सहन करणं खूप कठीण जात होतं. माझी बहीण दिसायला जरी नाजूक असली तरी तिचं मन कणखर होतं. तिने शक्य तितका लढा दिला होता,' असं त्याने पुढे लिहिलं.

आयुष्य किती क्षणभंगुर असतं याची जाणीव गुरूला त्यावेळी झाली. 'एका दिवशी तुम्ही सर्वांचे लाडके असता तर दुसऱ्याच दिवशी तुमची फक्त राख उरते. हे ऐकायला कठीण असलं तरी हेच वास्तव आहे. नियतीने आपल्यासाठी जे ठरवलंय त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि आपल्या माणसांना आनंदी ठेवू शकतो. माझी बहीण याच गोष्टींवर विश्वास ठेवायची. तिचं सुंदर हास्य कुटुंबासाठी काहीही करायची तयारी तिची नृत्यकला तिचं निर्मळ मन.. या सर्व गोष्टींमुळे तिला आम्ही कायम स्मरणात ठेवू' अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

आयुष्य किती क्षणभंगुर असतं याची जाणीव गुरूला त्यावेळी झाली. 'एका दिवशी तुम्ही सर्वांचे लाडके असता, तर दुसऱ्याच दिवशी तुमची फक्त राख उरते. हे ऐकायला कठीण असलं तरी हेच वास्तव आहे. नियतीने आपल्यासाठी जे ठरवलंय, त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि आपल्या माणसांना आनंदी ठेवू शकतो. माझी बहीण याच गोष्टींवर विश्वास ठेवायची. तिचं सुंदर हास्य, कुटुंबासाठी काहीही करायची तयारी, तिची नृत्यकला, तिचं निर्मळ मन.. या सर्व गोष्टींमुळे तिला आम्ही कायम स्मरणात ठेवू', अशा शब्दांत तो व्यक्त झाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Onion Price Hike : कांद्याने मुंबईकरांना रडवलं… कांदा महागला, किचनचं बजेट कोलमडलं
  • मराठी माणूस बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो आणि… परप्रांतीय तरुणाचे वादग्रस्त विधान
  • फक्त 3.50 लाखात घरी आणा ही नवीन कार, देते 34 किमी मायलेज, घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी
  • मला मेंटली टॉर्चर केलं जातंय..; दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर मोठा आरोप, अजितदादा असते तर..
  • घरातील किचनमध्ये झुरळ दिसले तर किचनच बंद करतो का? थेट तुकाराम मुंडे यांनाच विचारला सवाल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in