
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी आता सात महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी मोर्चेबांधणी केली आहे. पण चेन्नई सुपर किंग्स संघात काय बदल होणार? याची उत्सुकता कमालीची वाढली आहे. कारण मागच्या तीन पर्वात संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे खेळाडूंची ट्रेडिंग होत आहे. इतकंच काय तर मिनी लिलावातही काही खेळाडूंवर नजर लागून आहे. पण महेंद्रसिंह धोनी या पर्वात खेळणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. मागच्या पर्वात दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी खेळला नव्हता. आता त्याच्या बाबत क्रीडावर्तुळात चर्चाही रंगल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघात शेअर मागितला होता. पण त्याला व्यवस्थापनाने नकार दिल्याने धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात बिनसल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी या स्पर्धेत खेळला तरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून असेल की खेळाडू म्हणून.. हा देखील प्रश्न आहे. असं असताना चेन्नईसाठी खेळलेल्या माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने खुलासा केला की, धोनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळू इच्छित नाही.
एस बद्रीनाथने युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘महेंद्रसिंह धोनीने मला सांगितलं होतं की, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही. तो स्वत:ला एक फुल टाईम कीपर म्हणून पाहू इच्छित आहे. म्हणजेच मैदानात 20 षटकं थांबू इच्छित आहे. यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळू इच्छित नाही. पण मला वाटतं की जर त्याने असं केलं तर यामुळे चेन्नई सुपर किंग्सला फायदा होईल.’ बद्रीनाथच्या मते, धोनी डावाच्या शेवटी फलंदाजीला येतो. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चेन्नई सुपर किंग्सला फायदा होऊ शकतो. यामुळे संघाला धोनीचा अनुभव आणि फिनिशिंग क्षमतेचा लाभ मिळेल. त्यामुळे शरीरावर येणारा ताणही कमी होऊ शकतो.
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर त्याचा संघातील भूमिका संकुचित राहिली. पण आता 20 षटकं विकेटकीपिंग करण्याचा मानस असल्याने संघाला नक्कीच त्याला फायदा होईल.
Leave a Reply