
गंगाखेड मतदार संघाचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांमुळे जोरदार चर्चा सुरु आहे. काल आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतलेल्या टेस्ला गाडीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केली.
नव्या गाडीचा शुभारंभ करून नव्या संकल्पना, नव्या स्वप्नांना,आणि नवीन वाटचालीला सुरुवात करतोय अशी पोस्ट रत्नाकर गुट्टे यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
त्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे असलेल्या इतर गाड्यांचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत रत्नाकर गुट्टे यांच्याकडे एवढ्या आलिशान गाड्या आल्यात कुठून असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आत्तापर्यंत 3 निवडणुका लढवल्या, त्यापैकी त्यांना 2014 ला त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर रासापाने त्यांना पुन्हा 2019 ला संधी देत त्यांना विजयी केले.
त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये देखील रत्नाकर गुट्टे यांनी रासपाकडून निवडणूक लढवत दुसऱ्यांदा विजय मिळवला. 2024 च्या निवडणुकीनंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी रासपचे नेते महादेव जानकर यांना सोडून महायुतीचा हात पडकला.
महायुती सरकारमध्ये आल्यानंतर रत्नाकर गुट्टे हे सरकारमधील एक महत्त्वाचे आमदार म्हणून ओळखले जातात. अनेकदा त्यांनी गंगाखेडच्या रेल्वे गेट प्रश्नावर भाष्य केले.
गंगाखेडच्या विकासासाठी महायुतीसोबत गेलो असल्याचे सांगणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मतदार संघात केलेल्या विकासा ऐवजी त्यांच्याकडे असलेल्या टेस्टला, लँड क्रूज, फोरचुनर, आणि रेंज रोवर, गाड्यांची मतदारसंघात जास्त चर्चा रंगू लागली आहे.
गंगाखेडमध्ये अनेक काही समस्या आहेत. रस्त्यांची झालेली दुरावस्था. रेल्वे गेटचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, नागरिकांची यातून काही सुटका होताना दिसत नाही.







Leave a Reply