• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा… कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया

August 11, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना मानत पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. कपिल सिब्बल यांनी पुन्हा वेळ मागितल्याचा दावा त्यांनी केला. म्हस्के म्हणाले, “कपिल सिब्बल 1 तास उशीरा आले. ते पुन्हा अशीच वेळ मागतील. कायम भावनिक वातावरण तयार केलं जातंय. आजच्या सुनावणीत नवीन काही दिसलं नाही.”

पुढे ते म्हणाले, “पक्षापासून दूर युबीटी गेली आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत. चीफ जस्टीस यांच्यावर मी बोलणार नाही.”

काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांचा संदर्भ देत म्हस्के म्हणाले, “काँग्रेस अंतर्गत पण निवडणूका होत असतात. शिवसेना पक्ष पण हा आमच्या सोबत आहे. बाळासाहेबांचे विचार युबीटीने सोडले तेच त्यांना भोगावे लागत आहे.”

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरही म्हस्के यांनी भाष्य केले. “कपिल सिब्बल म्हणते ब्रम्हवाक्य नाही. आमचा युक्तीवाद होईल त्यावेळी त्यांना समजेल,” असे ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • D-Mart चा मेगा प्लॅन, 1,000 कोटींचं कर्ज उभारणार, एवढ्या पैशांचं करणार काय?
  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in