• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

D-Mart चा मेगा प्लॅन, 1,000 कोटींचं कर्ज उभारणार, एवढ्या पैशांचं करणार काय?

August 27, 2026 by admin Leave a Comment


देशातील ग्राहकांमध्ये D-Mart ची क्रेझ आहे. डी-मार्टचे संस्थापक आणि उद्योगपती राधाकिशन दमानी यांनी एक मोठा प्लॅन आखला आहे. कंपनी सात वर्षानंतर पुन्हा एकदा कॉर्पोरेट डेट मार्कटमधून निधी उभारण्याची तयारी करत आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारण्याची योजना तयार करत आहे. बाजारातून जवळपास एक हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी सुरू आहे. ग्रोसरी, किराणा उद्योग अधिक मजबूत करण्याचा प्रयत्नात कंपनी असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन किराणा व्यवसायात मोठी गुंतवणूक

राधाकिसन दमानी यांनी रिटेल व्यवसाय विस्तारावर भर दिला आहे. त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा राधाकिसन दमानी यांनी केली आहे. Avenue Supermarts ने आपल्या ऑनलाईन ग्रोसरी व्यवसायाची उपकंपनी Avenue e commerce limited मध्ये आणखी 500 कोटींची गुंतवणुकीस मंजूरी दिली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन घडामोडींमुळे कंपनीतील गुंतवणूक 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकेल. या नवीन अपडेटनंतर छोट्या शहरातही डी-मार्ट उघडले जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना जवळ करण्याचा प्रयत्न ग्रोसरी उद्योगाकडून करण्यात येत असल्याचे दिसते.

D-Mart चा ऑनलाईन व्यवसाय मजबूत

डी-मार्टचा ऑफलाईन रिटेल व्यवसाय देशभरात पसरला आहे. आता कंपनी ऑनलाईन ग्रोसरी आणि ई-कॉमर्स व्यवसायतही आपली उपस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑनलाईन व्यवसायासाठी कंपनीने मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट डेट मार्केटमधून निधी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी विस्तारावर भर देत आहे. त्यासाठी भांडवल उभारणीवर भर देण्यात येत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात हे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडांमधून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी कंपनीने ऑक्टोबर 2019 मध्ये बाँड्स बाजारात आणून निधी उभारला होता. यावेळी जारी करण्यात आलेल्या बाँड्सची मुदत 13 महिने होती. मात्र कंपनीने हे बाँड्स मुदतपूर्तीपूर्वीच, पुढील सहा महिन्यात रिडिम केले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ananya Panday : अनन्या पांडेचं ब्रेकअप ? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
  • घरात साप शिरल्यावर त्याला कसं पकडावं? सर्वात सोपी आयडिया कोणती; तिसरी ट्रिक तुम्हालाही जमेल!
  • वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? घ्या जाणून
  • सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
  • सूर्य, केतू, बुध यांचे गोचर, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचं फळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in