• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ananya Panday : अनन्या पांडेचं ब्रेकअप ? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?

August 27, 2026 by admin Leave a Comment


Ananya Panday Breakup : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday ) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही काळापासून अनन्या आणि वॉकर ब्लँको यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता दोघांनीही जवळपास दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आपापले मार्ग वेगळे केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यादरम्यान अनन्या आणि वॉकरची भेट झाली होती. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे भाष्य केलं नव्हतं. मात्र, सोशल मीडियावर समोर येणारे त्यांचे फोटो आणि एकमेकांच्या पोस्टवरील कमेंट्समुळे त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

परस्पर संमतीने घेतला ब्रेकअपचा निर्णय?

ETimesच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने दावा केला आहे की, अनन्याने गेल्या आठवड्यात हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा निर्णय दोघांच्या परस्पर संमतीने झाला असून त्यांच्यात कोणताही वाद किंवा मतभेद अथवा कटुता नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांत अनन्या आणि वॉकर अनेकदा एकत्र दिसले होते. एवढंच नाही तर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडिया पोस्टमधूनही खास स्थान दिलं होतं.

वॉकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं होतं चाहत्यांचं लक्ष

अनन्याच्या वाढदिवसाच्या प्रायव्हेट पार्टीतही वॉकर सहभागी झाला होता. तिच्या वाढदिवशी त्याने सोशल मीडियावर अनन्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. “हॅपी बर्थडे, ब्युटीफुल. तू खूप खास आहेस. आय लव्ह यू, अॅनी!” असं लिहीत त्याने शुभेच्छा दिल्या. वॉकरच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याची चर्चा आणखी वाढली होती. काही काळानंतर अनन्याला वॉकरच्या नावाच्या आद्याक्षरांचं नेकलेस घातलेलंही पाहण्यात आलं होतं.

याआधी अनन्याने प्रेमाबद्दल आपले विचार व्यक्त केले होते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे केवळ रोमँटिक नातं नसून मैत्री, विश्वास आणि समोरच्या व्यक्तीसोबत स्वतःसारखं राहण्याचं स्वातंत्र्य असल्याचं तिने सांगितलं होतं.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वे परिसरात अस्वच्छता केल्यास, आता भरमसाठ दंड, कोर्टाची पायरी देखील चढावी लागणार
  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in