• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आपल्या शेतात अनोख्या पांढऱ्या वांग्याची शेती करा, आणि कमवा लाखो रुपये…

June 7, 2026 by admin Leave a Comment


शेतकरी आता नेहमीची पठडीतील पिके सोडून नवनवीन प्रयोग करत आहेत. लोक आता पारंपारिक भाज्या सोडून काही वेगळ्या जातीच्या भाज्या उगवणे पसंद करत आहेत. त्यामुळे बाजारात या नव्या जातीच्या भाज्यांना चांगले भाव मिळत आहेत. यात आता पांढरी वांगी म्हणजेच व्हाईट ब्रिजंलची मागणी खूप वाढली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पूसा लॅबने पांढरी वांगी -1 नावाचे नवीन वाण विकसित केले आहे.

वांग्याच्या या नव्या जातीमुळे कमी वेळात जास्त उत्पन्न मिळते. शेतकरी आणि बागायतीची आवड असणाऱ्यांनी हा नफ्याचा सौदा होणार आहे. या जातीच्या वांग्याचे प्रीमियम क्वालिटीच्या बिया राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ऑनलाईन मिळत आहे. या बियांना घर बसल्या ऑर्डर करु शकता. चला पूर्ण माहिती पाहूयात..
पांढरी वांगी उगवण्याची पद्धत –

कृषी तज्ज्ञाच्या मते यास उगवण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सुपिक जमीन आणि पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. चांगले उत्पन्न येण्यासाठी बिया पेरण्यासाठी जमिनीची चांगली मशागत आणि संतुलित खतांचा वापर करणे गरजेचे असते. तर तुम्ही नियमित पाणी मिळण्याची काळजी घेतली तर वांग्याची ही व्हरायटी कमी पाणी आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानातही चांगले उत्पन्न देते.

पेरणीची योग्य वेळ

पांढऱ्या वांग्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे याच्या बिया पेरल्यानंतर केवळ ५० ते ५५ दिवसात पिक संपूर्णपणे कापण्यासाठी तयार होते. याच्या पेरणीसाठी उत्तर भारतात फेब्रुवारी ते मार्च आणि जून ते जुलै या दरम्यानचा काळ सगळ्यात बेस्ट मानला जातो. तर दक्षिण भारतात शेतकरी वर्षभर या वांग्याची शेती करु शकतात

घर बसल्या ऑनलाईन बिया मागवा

जर तुम्ही किचने गार्डन किंवा शेतासाठी या वांग्याच्या बिया खरेदी करु इच्छीत असाल तर तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. राष्ट्रीय बिया महामंडळाच्या ऑनलाईन स्टोरवर जाऊन तुम्ही खूप कमी किंमतीत या बियांना बुक करु शकता. एडव्हान्स जातीच्या १० ग्रॅमच्या बियांचे पाकिटाची किंमत केवळ ८० रुपये आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर या बिया थेट तुमच्या घरी डिलिव्हरी केल्या जातील.

बाजारात पांढरी वांग्यांना त्यांचा अनोखा रंग आणि चवीमुळे चांगली मागणी आहे. त्यामुळे केवळ ८० रुपयांच्या किंमतीच्या बियांमुळे तुम्हाला चांगले वांग्याचे उत्पन्न मिळून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in