• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधीच भाजप श्रेष्ठींची नाराजी, आता वडीलांच्या घोडचुकीने कृष्णराज महाडिकांना धक्का, धनंजय महाडिक यांचे ते वक्तव्य चर्चेत

September 6, 2026 by admin Leave a Comment


मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटवली, त्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि मनसेमध्ये जुंपली. मनसेच्या गडातच भाजयुमोने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याला मनसेने आक्रमक उत्तर दिले. या सर्व प्रकारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कान टोचले. त्यांना कानमंत्र दिला. हा वाद शमत नाही तोच काल कोल्हापूरातील दसरा चौकात त्यांचे वडील धनंजय महाडिक यांच्याकडून एक घोडचूक झाली. दहीहंडी उत्सावात ते असं काही बोलून गेले की, अनेकांसह कृष्णराज महाडिक यांच्यासह भाजपलाही धक्का बसला. अनवधानाने केलेले हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.

स्लीप ऑफ टंगची जोरदार चर्चा

कोल्हापूरातील दसरा चौकात दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. त्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काय बोलतात यासाठी तरुणाई, समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोलण्याच्या ओघात धनंजय महाडिक यांना आपला मुलगा कोणत्या पक्षाच्या संघटनेचे नेतृत्व करत आहे, याचा जरा विसर पडला. त्यांच्या या स्लीप ऑफ टंगची मग राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

भाषणाच्या ओघात धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांना महाराष्ट्र काँग्रेस युवक अध्यक्ष करून टाकले. पुत्रप्रेम आणि धावत्या समालोचनात त्यांची स्लीप ऑफ टंग झाले हे सर्वांनाच कळाले. पण त्यांच्या वक्तव्याची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. मुलगा कृष्णराज महाडिक हा भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष आहे, याचा भाषणाच्या ओघात त्यांना विसर पडला. “आज कृष्णराज महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष…इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी विश्वास टाकला आहे.” असे ते बोलून गेले.

काँग्रेसच्या प्रतिक्रियेची उत्सुकता

आता सर्वात मोठी कडी म्हणजे ही चूक त्यांना मंचावर बसलेल्या एकाने लक्षात आणून दिली नाही. बोलण्याच्या ओघात धनंजय महाडिकांनाही ही चूक काही लक्षात आली नाही. कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबाला खूप काही दिले हे सांगत असताना आपण काय बोलून गेलो हे त्यांच्या ध्यानीमनी आले नाही. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली नाही. काँग्रेस नेते त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देतात की थेट ऑफर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंना टिळा आवश्यक, विश्व हिंदू परिषदेची नियमावली..
  • भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला…
  • Prajakta Mali: घरच्यांना समजावणं अवघड.., लग्नाच्या दबावावर अखेर प्राजक्ता माळी स्पष्टच बोलली
  • Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उचललं मोठं पाऊल, पुन्हा मॅच फिक्सिंगची चर्चा, खेळाडूंकडून काढून घेतले…
  • Sanjay Raut: तुम्ही पिशवी घेऊन या, आपण बाजारात जाऊ, महागाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना घेरलं, म्हणाले काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in