• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आचार्य चाणक्य सांगतात, चुकूनही आयुष्यात येणाऱ्या ‘या’ लोकांचा अपमान करु नका, नाहीतर…

June 28, 2026 by admin Leave a Comment


आयु्ष्यात अनेक माणसं येतात आणि जातात… कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर राहत नाही. त्यामुळे कोणाचा अपमान करण्यात आणि कोणाला वाईट बोलण्यात काहीही अर्थ नाही. आचार्य चाणक्य देखील म्हणतात की, आयुष्यात काही विशिष्ट व्यक्तींचा चुकूनही अपमान करू नये. जी व्यक्ती नेहमी आदर आणि नम्रतेने वागते, तिच्या आयुष्यात कमी अडथळे येतात. आयुष्यात काही व्यक्तींचा आदर केल्याने आपण समाजात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून विकसित होऊ शकतो. पण, चाणक्य असा इशारा देतात की, त्यांचा द्वेष करणे किंवा त्यांचा अपमान करणे हे व्यक्तीच्या संपूर्ण विनाशास कारणीभूत ठरू शकते.

चाणक्य नीति सांगते की, आपण आपल्या गुरूंचा आणि समाजातील ज्ञानदात्यांचा, चुकूनही, कधीही अपमान करू नये. ज्ञानी लोकांचा अपमान केल्याने आपण आपली बुद्धी आणि शहाणपण गमावतो. त्यांच्या शापामुळे आपल्याला आयुष्यभर अपयश येईल.

चाणक्य नीतीमध्ये आपल्याला आठवण करून देतात की आपण आपल्या आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा किंवा वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर आणि सन्मान केला पाहिजे. त्यांचा अनुभव आपल्याला जीवनातील संकटांमधून मार्ग दाखवू शकतो. आपण त्यांना घरातून बाहेर काढू नये किंवा त्यांचा अपमान करू नये. चाणक्य सांगतात की जे घर त्यांचा अपमान करते, ते घर देवी लक्ष्मी सोडून जाते.

चाणक्य नीती सांगते की शासकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा अपमान करू नये. पूर्वी याचा अर्थ राजा असा होता, पण आज त्याचा संदर्भ न्यायव्यवस्था, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा देशाच्या शासकांपर्यंत जातो. सत्ता आणि अधिकारपदावरील लोकांचा विनाकारण अपमान करणे किंवा त्यांच्याशी वैर ठेवणे आपले जीवन दुःखमय बनवू शकते.

चाणक्य नीती सांगते की, जे लोक स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा इतरांच्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगतात, त्यांचा कधीही अपमान करू नये. यामध्ये सैनिक, पोलीस इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकते.

आपल्या आरोग्याचे आणि जीविताचे रक्षण करणाऱ्या डॉक्टरांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा आपण कधीही अनादर करू नये. आजारपणात किंवा धोक्याच्या वेळी त्यांनीच आपल्याला मदत करायला हवी. त्यांच्याशी शत्रुत्वपूर्ण वागणूक ठेवल्यास जीवघेण्या परिस्थितीत आपण एकटे पडू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Team India : टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी?
  • FIFA 2026 स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ थोडक्यात वाचला, एका अंगठ्याच्या अंतराने कोलंबियाचा विजय हिरावला
  • रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा; आली टॉप ट्रेंडिंगमध्ये!
  • Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच…
  • फिफा वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडताच उरुग्वे संघाला शिक्षा, चार्टर फ्लाइट केलं रद्द! आता परतणार कसे?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in