• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अहिल्यानगरात ATS ची मोठी छापेमारी, पाकिस्तानी गँगस्टर्सच्या…कारवाईत कमालीची गुप्तता; काय घडतंय?

June 3, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा चांगल्याच अलर्ट मोडवर आहेत. नुकतेच दिल्ली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्त्वाच्या शहरांत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. (संग्रहित फोटो)

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या संशयितांकडे शस्त्रं सापडली आहेत. त्यांचा संपर्क पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आता तपाससंस्था देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. (संग्रहित फोटो)

असे असतानाच आता अहिल्यानगरातील श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएस पथकाने छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयाखाली महाराष्ट्र एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. (संग्रहित फोटो)

चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान गँगस्टरच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. (संग्रहित फोटो)

चौकशीदरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. संशयितांनी पाकिस्तानी गँगस्टरच्या सूचनेनुसार काहींच्या घराची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (संग्रहित फोटो)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in