• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Viral Video : पोस्टरवर गाय दिसली, वासराला वाटलं ही तर माझी आई, पुढे केलं असं काही की पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

September 6, 2026 by admin Leave a Comment


प्राणी बोलू शकत नसले तरी त्यांच्या कृती अनेकवेळी भरपूरकाही सांगून जातत. असंच घडलं केरळमधील एका लहानशा गावात. या गावातील व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पहा त्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?

ग्रमीण भागात रस्त्याच्या कडेला एक दूध डेअरीची गाडी उभी आहे. या गाडीवर छापलेल्या गाईच्या मोठ्या चित्रामुळे एका छोट्या वासराचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आईपासून दूर झालेल्या या वासराने चित्रातील गाईला खरी गाय समजून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. हा निरागस क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दूध डेअरीच्या वाहनावर गाईचे मोठे चित्र दिसते. हे चित्र पाहताच वासरू त्या वाहनाजवळ पोहोचते. त्यानंतर ते मागच्या दोन पायांवर उभे राहून चित्रातील गाईकडे पाहत दूध पिण्याचा प्रयत्न करताना दिसते. वासराच्या या कृतीतून त्याची आईसाठी असलेली ओढ आणि प्रेम स्पष्टपणे जाणवते.

चित्र आणि प्रत्यक्ष गाय यातील फरक समजण्याइतके वासराचे जग अजून मोठे झालेले नाही. त्यामुळे समोर दिसणारी गायच आपली आई असावी, या भावनेतून त्याने केलेला प्रयत्न मनाला चटका लावणारा ठरतो. काही क्षणांसाठी त्या वासराला चित्रामध्येच आपल्या आईची माया दिसत आहे. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी वासराच्या निरागसपणाचे कौतुक केले असून, प्राण्यांमध्येही भावना आणि आपुलकी किती खोलवर असते, याची जाणीव या प्रसंगातून होते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने सांगितलं आहे की, हे अत्यंत भावनिक होतं.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने सांगितले आहे की… प्राण्यांमध्ये किती आपुलकी आणि निरागस पणा असतो पहा.

आई आणि लेकराच्या नात्याची ओढ किती नैसर्गिक असते, हे या छोट्याशा घटनेने पुन्हा दाखवून दिले. वासराचा हा निरागस प्रयत्न पाहून इंटरनेटवरील अनेक लोक भावुक झाले असून, हा व्हिडिओ मनात घर करून राहिला आहे. तरी काही जणांनी हा व्हिडीओ एआय असल्याचं सांगितलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…
  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in