
सरसंघचालक मोहन भागवत विशेष संवाद साधणार आहेत, हा संवाद आता तुम्ही तुमच्या भाषेतही ऐकू शकता. सहा सप्टेंबर रोजी रविवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री साडेआठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्हाला https://anuvadini.aicte.gov.in/live/rss-london या लिंकवर जावं लागणार आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर मेन्यूमधून तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा निवडून हा विशेष संवाद ऐकू शकणार आहात, तसेच तुम्हाला भाषणाचा मजकूर देखील वाचता येणार आहे.
मोहन भागवत हे कायमच देशातील नागरिकांसोबत संवाद साधत असतात. तरुणांना मार्गदर्शन करत असतात. संघाचं कार्य विविध मार्गाने देशातील नागरिकांपर्यंत पोहचावं यासाठी संघाचे प्रयत्न सुरू असतात. संवादाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न संघाकडून होतो.
Leave a Reply