• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधीच 3 वादळांचं संकट! आता चौथ्या महासंकटाची चाहूल, प्रशांत महासागरात भयंकर, भारतासाठी काय धोका?

September 6, 2026 by admin Leave a Comment


प्रशांत महासागरात सध्या एकाच वेळी तीन चक्रिवादळे सक्रिय असून त्यांचा कहर सुरू आहे. त्यातच आणखी एक चौथे वादळ तयार होण्याची शक्यता वाढली आहे. यापैकी एका वादळाच्या वाऱ्यांचा वेग तब्बल 241 किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला आहे. या वादळामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जवळपास दशकभरानंतर पहिल्यांदाच प्रशांत महासागरात एकाच वेळी तीन वादळे सक्रिय झाली आहेत. त्यामुळे मेक्सिकोपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियापर्यंत चिंता वाढली आहे.

यंदा प्रशांत महासागरातील वादळांची सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामागे एल निनोची स्थिती हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एल निनोची स्थिती लवकरच विक्रमी पातळीपर्यंत मजबूत होऊ शकते. सध्या सक्रिय असलेल्या तीन वादळांमध्ये चक्रिवादळ लोवेल सर्वात शक्तिशाली आहे. हे सध्या कॅटेगरी -4 चे अत्यंत धोकादायक वादळ आहे. त्याच्या वाऱ्यांचा कमाल वेग सुमारे 241 किलोमीटर प्रतितास नोंदवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, लोवेल पुढील काही दिवस मोठ्या चक्रि‍वादळात परावर्तित होऊ शकते.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवाईच्या काही भागांमध्ये या वादळामुळे समुद्रात उंच आणि धोकादायक लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. रिप करंट आणि धोकादायक सर्फ कंडिशनमुळे नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पश्चिम हवाई बेटांमधील काही भागांसाठी पुढील काळात ट्रॉपिकल स्टॉर्म वॉच जारी केली जाऊ शकते.

करीना चक्रीवादळ कमजोर

चक्रीवादळ करीना आता कमजोर होऊन कॅटेगरी-1चे वादळ राहिले आहे. शनिवारी सकाळी ते हवाईतील हिलो शहरापासून सुमारे 800 मैल पूर्वेला होते. करीना वाऱ्यांचा वेग सुमारे 120 किलोमीटर प्रतितास होता आणि ते ताशी 8 मैल वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत होते. करीना पुढील काही दिवसांत वेगाने कमजोर होईल. पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे वादळ पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे जमिनीवर कोणताही मोठा धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मॅरी वादळाचीही चाहूल

तिसरे वादळ म्हणजे चक्रीवादळ मॅरी. हे सध्या कॅटेगरी-1चे वादळ आहे. मॅरीच्या वाऱ्यांचा कमाल वेग सुमारे 140 मैल प्रतितास होता आणि ते ताशी 14 किलोमीटर वेगाने कॅलिफोर्नियाच्या दिशेने सरकत होते. मात्र, मॅरीदेखील पुढील काही दिवसांत हळूहळू कमजोर होण्याचा अंदाज आहे.

चौथ्या वादळाचा धोका

हवामान विभागाचे लक्ष आता समुद्रात तयार होत असलेल्या चौथ्या सिस्टमकडे लागले आहे. हे सिस्टम नैऋत्य मेक्सिकोच्या किनाऱ्यापासून बऱ्याच दूर समुद्रात आहे. ते पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने ताशी 10 ते 15 मैल वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांनी या सिस्टमचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता 60 टक्के असल्याचे म्हटले आहे. जर हे वादळ तयार झाले, तर त्याला नॉर्बर्ट असे नाव दिले जाऊ शकते. यामुळे अमेरिका आणि मेक्सिकोत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक
  • Success Story : चालणे तर सोडाच, बसणेही कठीण… 90 टक्के दिव्यांग तरी थेट IIT मध्ये एन्ट्री; 17 वर्षीय संतोषचा संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • Sai Tamhankar Photoshoot : नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, सौंदर्यावर चाहते फिदा, फोटो पाहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in