• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं

September 6, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अमीषा 50 च्या पुढे असूनही अद्याप सिंगल आहे आणि लग्न करण्याचा सध्या तिचा कोणताही विचार नसल्याचं ती अनेकदा स्पष्ट करताना दिसली आहे. मात्र, तिच्या लिंकअपच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगत असतात. आता तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत जोडलं जात आहे.

या चर्चेला सुरुवात एका पार्टीतील व्हिडीओमुळे झाली. अमीषा आणि हार्दिक नुकतेच एका पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी अमीषाने हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आलं.

एका सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ शेअर करत अमीषाने हार्दिकच्या खांद्यावर ज्या पद्धतीने हात ठेवला, त्यावरून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचा दावा केला. युजरच्या या पोस्टवर अमीषाने स्वतः प्रतिक्रिया देत खोडकर आणि उपरोधिक अंदाजात अफवांना उत्तर दिलं.

अमीषाने संबंधित पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. तिने उपरोधिकपणे म्हटलं की, होय, युजरचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि तिचा हात हार्दिकच्या खांद्यावर रोमँटिक अंदाजात होता. त्यानंतर तिने त्या युजरला टोला लगावत, अशा प्रकारच्या गोष्टी शेअर करण्याआधी आयुष्यात एखादी मैत्रीण असावी असा सल्लाही दिला.

अमीषाच्या या उत्तरामुळे तिच्या आणि हार्दिकच्या लिंकअपच्या चर्चांना आणखी हवा मिळाली असली तरी दोघांच्या नात्याबाबत अभिनेत्रीने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चांना सध्या केवळ अफवा म्हणूनच पाहिलं जात आहे.

हार्दिकचं नाव मिहिका शर्मासोबतही जोडलं जातं

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहेत. त्याच नाव मॉडेल मिहिका शर्मासोबत जोडलं जात आहे. हार्दिक आणि त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक यांचं नातं संपल्यानंतर त्याच्या आयुष्यात मिहिकाची एंट्री झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

‘गदर 2’नंतर अमीषा पुन्हा चर्चेत

अमीषाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओलसोबत झळकली होती. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. ‘सकीना’ आणि ‘तारा सिंह’ ही जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता अमीषा ‘गदर 3’मध्येही दिसणार असल्याचं तिने यापूर्वी स्पष्ट केलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in