• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार

September 6, 2026 by admin Leave a Comment


नवी मुंबई विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रात्रीच्या सुमारास महिला प्रवाशासोबत ओला चालकाने कथितरित्या विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने निर्जन रस्त्यावर कॅब थांबवून मागील सीटवर एकट्या बसलेल्या महिलेच्या जवळ जाऊन तिचा हात पकडला आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध करत आरडाओरड केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे म्हटले जात आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफजल शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

पार्टीवरून परतताना घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी चेंबूर येथे गेली होती. रात्री परतताना तिच्या एका मित्राने ओला कॅब बुक केली. कॅबने महिलेला पनवेल येथील तिच्या घरी सोडण्यासाठी प्रवास सुरू केला. रात्री सुमारे एक वाजता कॅब नवी मुंबई विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर पोहोचली. हा परिसर त्यावेळी निर्जन होता. याच ठिकाणी चालकाने अचानक कॅब थांबवली आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने खाली उतरत असल्याचे सांगितले…

महिलेने आरडाओरड करत केला विरोध

काही वेळाने चालक पुन्हा कॅबमध्ये आला आणि थेट मागील सीटवर महिलेच्या शेजारी जाऊन बसला. त्यानंतर त्याने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून कॅबमधून बाहेर पडत आरोपीचा प्रतिकार केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पनवेल पोलिसांनी महिलेला विमानतळ पोलिसांकडे सोपवले

घटनेनंतर महिलेने आपल्या कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली आणि घरी पोहोचली. त्यानंतर ती तक्रार दाखल करण्यासाठी पनवेल पोलीस ठाण्यात गेली. मात्र, घटनास्थळ नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पनवेल पोलिसांनी महिलेला आपल्या वाहनातून विमानतळ पोलिस ठाण्यात नेले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in