• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक

September 6, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात, मात्र त्यातील काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच साप हे विषारी आहेत. ज्यामध्ये नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो, दुसरा सर्वात विषारी साप म्हणजे मण्यार, फुरसे आणि घोणस हे भारतामधील प्रमुख चार विषारी साप आहेत. याला आपण बिग फोर असं देखील म्हणतो. विशेष म्हणजे हे चारही साप महाराष्ट्रात आढळून येतात. सध्या घोणस प्रजातीच्या सापाची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सापांपासून बचावाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कायम सावध राहणं हाच आहे. जर तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या.

सापांपासून बचावासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये विविध उपाय केले जातात. विशेष: जे लोक ग्रामीण भागांमध्ये राहतात, किंवा ज्यांच्या वस्त्या या जंगल परिसरात आहेत, अशा लोकांना तर सापांचा धोका अधिक असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर साप अशा ठिकाणी अनेकदा घरामध्ये शिरतात. सापांपासून बचावासाठी या लोकांकडून काही पारपरिक उपाय देखील केले जातात. आदिवासी समाजामध्ये सापांपासून बचावासाठी एक खास ट्रिक वापरली जाते. ती म्हणजे ज्या घरात सर्पवेल असेल त्या घरात शक्यतो साप येत नाही, कारण या वेलीला विशिष्ट वास असतो. अनेकजण या वेलाच्या वाळलेल्या काड्या कायम आपल्या खिशामध्ये ठेवतात, यामुळे सापांपासून संरक्षण होतं अशी मान्यता आहे. आदिवासी पाड्यांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये आजही अनेक ठिकाणी ही ट्रिक वापरली जाते.

मात्र या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. यामुळे सापांना लपण्यसाठी जागा सापडत नाही, तसेच जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. चुकून एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झालाच तर थोडा देखील वेळ वाया न घालवता अशा व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावं,  वेळेत उपचार मिळाला तर अशा रुग्णाचा जीव वाचू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
  • मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन्…
  • Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल, उपचार देण्याचा प्रयत्न…
  • Strong Beer : ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
  • शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाण्यांचा खजाना पाहून डोळे चमकले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in