
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये ईशा एका व्हॅनमधून बाहेर येताना दिसत आहे. तिला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं.
ईशा गुप्ता व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर काही चाहते तिच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान गर्दीतील एका चाहत्याने ईशाच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अभिनेत्री ईशा गुप्ता काहीशी घाबरलेली आणि अस्वस्थ झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या प्रकारानंतर ईशाने संबंधित व्यक्तीला जाब विचारत, ‘तुम्ही मला का टच करत आहात?’ असं म्हटलं. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. ईशा गुप्ताची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनी केलं ईशाचं समर्थन
व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी ईशाच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. सेलिब्रिटींसोबत फोटो काढताना किंवा त्यांच्याजवळ जाताना त्यांच्या वैयक्तिक अवकाशाचा आणि संमतीचा आदर करणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, ईशा गुप्ताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, तिच्या प्रतिक्रियेचीही चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीला अचानक आलेल्या या अनुभवामुळे ती अस्वस्थ झाल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होतं.
ईशा गुप्ता माहिती
ईशा गुप्ताचा जन्म 28 नोव्हेंबर 1985 रोजी झाला आहे. ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि 2007 च्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. तिने हिंदी, तेलुगू तसेच तमिळ भाषेतील चित्रपटात, अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
View this post on Instagram
ईशा गुप्ताने 2007 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश केला, जिथे तिने तिसरे स्थान पटकावले आणि मिस इंडिया इंटरनॅशनल खिताब जिंकला आणि नंतर मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. आता पर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इमरान हाश्मीसोबतचा तिचे गाणं आणि चित्रपट खूप सुपरहिट ठरला.
Leave a Reply