• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Viral Video: तैवान स्टार चेंग चांग फॅन भारतीय तरुणीच्या प्रेमात असल्याचं नाटक? व्हायरल व्हिडिओनंतर आता चकित करणारा खुलासा

August 27, 2026 by admin Leave a Comment


Ching Chan Fan Video Viral: तैवान अभिनेता आणि मॉडेल चेंग चांग फॅनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये तो एका भारतीय महिलेला मिठी मारताना आणि तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून, सोशल मीडिया यूजरने त्यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लावले आहेत. दोघांनीही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. 2025 मध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एका हॉटेलमधील महिला कर्मचारीने पारंपरिक आरती आणि तिलक लावून त्याचे स्वागत केले होते. यावेळी, चेंग तिच्याकडे प्रेमाने पाहताना दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांच्या लक्षात त्यांचे नाते आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

आता, जवळपास एक वर्षानंतर, चेंग चांगने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ही क्लिप आता त्याच्या अकाउंटवर दिसत नाही. या व्हिडिओमध्ये तो एका भारतीय महिलेला भेटताना आणि तिला मिठी मारताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की ही तीच हॉटेल कर्मचारी आहे जिला तो पहिल्यांदा भेटला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cheng. 范成章 (@chengchangfan)

चेंगने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यानंतर त्याने याच तरुणीसोबतचे फोटो पोस्ट केले. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, त्याला भारतात आपलेपणाची भावना जाणवली, ज्यामुळे त्याला तेथील लोकांशी जोडल्यासारखे वाटले. त्याने हॉटेलमधील आपल्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली आणि भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cheng. 范成章 (@chengchangfan)

चेंग चांग फॅन हा एक तैवानी अभिनेता आणि मॉडेल आहे. वृत्तानुसार, तो तैपेईचा असून त्याने लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्समध्ये शिक्षण घेतले आहे. तो तैपेईमध्ये फुलांचा व्यवसायही चालवतो. चेंगने डिओर, ह्यूगो बॉस आणि बरबरी यांसारख्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. तो २०२० च्या ‘क्रेविंग यू’ या ड्रामामधील भूमिकेसाठीही ओळखला जातो. त्याने २०२२ मध्ये ‘एन्ट नथिंग’ हे त्याचे एकल गाणेही प्रदर्शित केले. सध्या, चेंग आणि त्या भारतीय महिलेच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, परंतु त्या दोघांपैकी कोणीही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

पण आता या अभिनेताबद्दल चकित करणारा खुलासा समोर आला आहे. चेंग चांग फॅनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स पुन्हा समोर येत आहेत, ज्यामुळे त्याच्या लैंगिकतेवर प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तो गे असल्याचे समजत आहे. याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?
  • भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
  • Kangana Ranaut : बेडरूममध्ये वटवाघळासारखं… कंगना राणावतने रामदेव बाबांची उरलीसुरली सर्व काढली; धक्कादायक विधान काय?
  • चीन, पाकिस्तान, अमेरिका नव्हे शेवटी संकटात भारतच धावून आला… जलप्रलय येताच नेपाळला मोठी मदत; नेपाळ सरकार म्हणालं…
  • नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in