
सूत्रांच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामागे चीनकडून माहिती देण्यात आलेला विलंब हे प्रमुख कारण ठरले आहे. चीनने नेपाळला पुराची माहिती तब्बल ४५ मिनिटांच्या विलंबाने दिल्याने अनेक ठिकाणी हाहाकार माजल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर, हिम तलाव फुटणार असल्याची माहिती चीनकडे आधीपासूनच उपलब्ध होती असेही सूत्रांनी सांगितले आहे.
भारत आणि नेपाळ सीमेवरील उंच पर्वतीय परिसरात चीनचे एक अत्याधुनिक रिमोट सेन्सिंग स्टेशन कार्यरत आहे. चीनची वैज्ञानिक टीम या संवेदनशील क्षेत्रावर सतत बारीक नजर ठेवून असते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने संभाव्य धोक्याची माहिती वेळेत नेपाळला देणे अपेक्षित होते. मात्र, चीनने दिलेल्या या ४५ मिनिटांच्या उशिरा माहितीमुळे नेपाळमधील पूरस्थिती अधिक गंभीर झाली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळेत माहिती मिळाल्यास नेपाळला आवश्यक उपाययोजना करणे शक्य झाले असते, असे म्हटले जात आहे.
Leave a Reply