• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू

August 27, 2026 by admin Leave a Comment


पुण्याच्या बारामतीत काही आठवड्यांपूर्वी विमान कोसळल्याची घटना घडली होती. बारामतीमधील विमान दुर्घटनेची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भीषण विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमान प्रशिक्षक आणि शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला आहे. भारतातील वाढत्या विमान दुर्घटनेने प्रवाशांमध्ये भीती वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानातील पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाला आहे. विमानात बिघाड झाल्यानंतर विमान हे गंगा बॅरेजजवळ येऊन कोसळलं. विमान कोसळल्यानंतर अनेक तुकडे झाले. पोलिसांनी दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आता दोघांचे रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. विमान हे डबल इंजिनचे असून 4 सीटर एअरक्राफ्ट होते. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं आहे.

विमान हे गर्ग एव्हिएशनचे होते. प्रशिक्षणादरम्यान विमान हे कानपूरच्या नाथा खेडा भागातील गंगा बॅरेजजवळ कोसळलं. या विमान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला घटनास्थळी उपस्थित बचाव पथकाने विमानच्या ढिगाऱ्यातून दोन गंभीर जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासाणीनंतर मृत घोषित केले.

 

#WATCH | UP | A twin-engine four-seater training aircraft crashes in a field in Kanpur; Instructor pilot and trainee pilot killed, say police. pic.twitter.com/XihvcSo1xj

— ANI (@ANI) August 27, 2026

कानपूरच्या ग्वालटोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रघुवीर लाल हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. विमान अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एक गर्दी झाली. काही वेळाने पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. शिकाऊ विमान गुरुवारी सकाळी 11.20 वाजता कानपूरच्या कँट क्षेत्रातून उड्डाण घेतलं होतं. विमान अपघातात कर्नाटकातील रहिवासी अभिषेक पुजारी आणि गुजरातचे सुमित भाटिया या दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही पायलटच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्या अकाली मृत्यूने सहकारी हळहळ व्यक्त करताना दिसत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं, वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल
  • रक्षाबंधनाच्या दिवशी कुंभ राशीत होणार चंद्र ग्रहण, 28 ऑगस्टपासून या 5 राशींच्या वाढणार अडचणी
  • 22000 कोटींचं कर्ज, केवळ 6.5 कोटीत निपटलं… सुभाष चंद्रांना कर्जमाफी मिळताच विजय माल्या संतापला; खोचक ट्विट काय?
  • 82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर सर्व खेळाडू तंबूत, आठ खेळाडूंना खातही खोलता आलं नाही
  • Parel Laxmi Cottage : परेलमध्ये रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा, अनेक जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, आदेश दिले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in