• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं, वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल

August 27, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे, यावरून वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही? हे मला माहिती नाही, त्यावर मी बोलू शकत नाही. मात्र महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विजय विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मित्र पक्षांना संपवण्यापेक्षा त्यांच्यासोबत काम करणं गरजेचं आहे. 2014 ला काँग्रेसमुळे सत्ता गेली. आम्ही महायुतीमध्ये जाण्याची चर्चा आहे, मात्र आम्ही महायुतीमध्ये गेलो का? आम्ही आहे तिथेच आहोत, मग आम्हाला टार्गेट का केलं जात आहे. विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले? ते त्यांनी सांगावं, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी कोणाची सुपारी घेतली हे त्यांनी सांगावं, मित्राची गरज काँग्रेसला वाटत नाही का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे आरोप सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य, केतू, बुध यांचे गोचर, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचं फळ
  • हॉटेलमध्ये स्टे करण्याची प्रक्रिया सोपी झाली, आता Aadhaar Card copy ऐवजी ही पद्धत वापरली जाणार…
  • Riteish Deshmukh: माझ्या वाईट काळात हिने.. रितेश देशमुख बायकोचं कौतुक करायला गेला अन्..
  • HDFC Bank च्या शेअरमध्ये अचानक मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये पसरली भीती, काय घडलं?
  • घर पडलंय… बहीण बेपत्ता… नेपाळमध्ये महाप्रलय कसा आला? संकट रोखता आलं असतं? वाचा Special Report

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in