• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nitesh Karale : राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील एक चूक पडली महागात, राजकीय वर्तुळात खळबळ

August 27, 2026 by admin Leave a Comment


वर्ध्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नितेश कराळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यानंतर वर्धा शहर पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर यांना वर्धा शहर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे.
कराळे यांनी सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. नितेश कराळे यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मागच्या वर्षीही केलं होत वादग्रस्त वक्तव्य 

वर्ध्यातील नितेश कराळे हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कराळे यांच्या भाषणाचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. ते मजेदार शैलीत राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करत असतात. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. कराळे हे पेशाने शिक्षक आहेत. राजकारणाच्या आवडीमुळे त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आता हेच कराळे मास्तर अडचणीत सापडले आहेत.  कराळे मास्तर यांनी मागच्या वर्षी कुंभमेळ्यावरील खर्चावर भाष्य केलं होतं. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटींचा खर्च करण्यात येतो, हा फालतू खर्च आहे. तसेच कुंभमेळ्यात साधू हे गांजा फुकण्यासाठी येतात, असं वक्तव्य कराळे मास्तर यांनी केलं होतं. कराळे यांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाच्या दिवशी कुंभ राशीत होणार चंद्र ग्रहण, 28 ऑगस्टपासून या 5 राशींच्या वाढणार अडचणी
  • 22000 कोटींचं कर्ज, केवळ 6.5 कोटीत निपटलं… सुभाष चंद्रांना कर्जमाफी मिळताच विजय माल्या संतापला; खोचक ट्विट काय?
  • 82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर सर्व खेळाडू तंबूत, आठ खेळाडूंना खातही खोलता आलं नाही
  • Parel Laxmi Cottage : परेलमध्ये रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा, अनेक जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, आदेश दिले
  • Tukaram Mundhe: जाणूनबुजून सेलिब्रिटींना केलं टार्गेट? जाहिरातीबद्दल तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in