• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्या मराठीने वेड लावले, आता भाषेची शिकवणी घेणार? काय दिले उत्तर?

September 8, 2026 by admin Leave a Comment


गणेशोत्सवासह सार्वजनिक ठिकाणी डीजे, कर्णकर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या साऊंड सिस्टिमविरोधात विद्यानंद बापट यांनी रान पेटवले. त्याला सुजाण पुणेकरांनीही पाठिंबा दिला. त्यांच्या या मागणीमुळे राज्यातील अनेक शहरात पोलिस प्रशासनाने डीजेवर बंदी घातली आहे. अनेक नागरिकांनी या मोहिमेला मोठा पाठिंबा दिला आहे. तर विद्यानंद बापट यांच्या मराठीची सध्या चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. अनेकांनीही सोशल मीडियावर त्यांच्याकडून भाषेची शिकवणी लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका पॉडकॉस्टमध्ये बापटांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं.

संस्कृत म्हणी, मराठीचा वापर

विद्यानंद बापट यांच्या मराठीचे कौतुक होत आहे. अस्खलित मराठी भाषेतील त्यांचे संवाद, इंग्रजी म्हणी आणि संस्कृत सुभाषितांचा वापर, म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर यामुळे बापट यांची मराठी सध्या राज्यात कौतुकाचा विषय आहे. सध्या अनेक जण इंग्रजळलेली आणि हिंदीमिश्रित शब्दांचा वापर करत मराठी बोलत असल्याचा आरोप करण्यात येतो. सोशल मीडियावर तर त्यावर चर्चा झडत आहेत. त्याचवेळी बापट यांची मराठी काहींना अर्थबोध न होणारी वाटत आहे. काहींना ती बोजड वाटत आहे. काहींना त्यावर संस्कृत भाषेचा प्रभाव वाटत आहे. असे असले तरी त्यांच्या भाषेने मराठीविषयी जागरुकता वाढली आहे.

मराठी भाषेची शिकवणी घेणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्याकडे शिकवणी, ट्युशन लावण्याची कल्पना मिश्किलपणे मांडली होती. सोशल मीडियावर सुद्धा अनेकजण त्यांच्याकडे मराठी भाषेची शिकवणी लावण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या या मिश्किल मागणीवर विद्यानंद बापट यांनी समर्पक उत्तर दिले आहे. एका पॉडकॉस्टमध्ये त्यांनी हे उत्तर दिले.

भाषा हे साधन आहे, साध्य नाही. एखादा मुद्दा मांडण्यासाठी भाषा वापरावी. पण त्याहून अधिक तिचा किस पाडत बसू नये. खुर्ची, टेबल याला काहीतरी संस्कृत शब्द शोधून काढावा असं काही वाटत नाही. समोरच्याला कळेल असे शब्द वापरावेत, समोरील व्यक्तीला त्याचा अर्थबोध होणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलते होण्याची गरज व्यक्त करत बापट यांनी मराठी भाषेची शिकवणी घ्यावी असे वाटत नसल्याचे उत्तर दिले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivendraraje Bhosle: उगीच डिवचू नका… शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा कुणाला इशारा? साताऱ्यात संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
  • मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक, नेमकी काय चर्चा झाली?
  • Bigg Boss 20: आणखी एक फ्लॉप सीजन… ‘बिग बॉस 20’ सुरु होताच अभिनेता हे काय बोलून गेला?
  • Banking News: आली रे आली मोठी गुडन्यूज आली, सरकारकडून बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वा़ची घोषणा
  • Sanjay Dutt : जेलर महिलेने संजूबाबाला फक्त एकदाच खडसावलं अन्…, म्हणाल्या, ‘त्याला मराठी शिकता आली नाही, पण…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in