• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bigg Boss 20: आणखी एक फ्लॉप सीजन… ‘बिग बॉस 20’ सुरु होताच अभिनेता हे काय बोलून गेला?

September 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन अजून 48 तासही झालेले नाहीत, एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. घरातील स्पर्धक तर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने हे सिझन सरळ फ्लॉप सिझन असल्याचे म्हटले आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून असीम रियाज आहे. असीम रियाजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करताना ‘बिग बॉस २०’ला सुरू होताच ‘फ्लॉप सीजन’ घोषित केले. त्याने लिहिले की, “आणखी एक फ्लॉप सिझन लोडिंग.” मात्र, पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच त्याला जाणवले की प्रकरण बिघडू शकते, तेव्हा त्याने ती पोस्ट डिलीट केली. पण सोशल मीडियाच्या जगात स्क्रीनशॉट्सचे आयुष्य पोस्टपेक्षा जास्त असते. असीमने पोस्ट हटवताच इंटरनेटवर युजर्सचा राग अनावर झाला.

असीम रियाजवर भडकले युजर्स

सोशल मीडिया युजर्सने असीमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक लोकांनी लिहिले की हा असीमचा जुना पॅटर्न बनला आहे. दरवर्षी जेव्हा नवीन सीजन येतो, तेव्हा तो स्वतःला रिलेव्हलंट ठेवण्यासाठी शोवर टोमणे मारतो आणि मग पोस्ट डिलीट करून गायब होतो. युजर्सनी आठवण करून दिली की तो जरी कितीही फ्लॉप म्हणत असला तरी पण दरवर्षी ‘बिग बॉस’ टीआरपी चार्ट्सवर राज्य करतो आणि सोशल मीडियावर सातत्याने नंबर-१ वर ट्रेंड होतो.

एक युजरने लिहिले, “भाई, शोला २४ तासही झालेले नाहीत आणि तू निकाल दिलास? किमान सलमान खानचा तरी विचार केला असतास, ज्यांनी तुला या उंचीवर पोहोचवले.” इतकेच नाही तर अनेक जुन्या फॅन्सनी असीमला आरसा दाखवत सांगितले की ते आजही ‘बिग बॉस १३’च्या त्या काळातून बाहेर पडू शकलेले नाहीत. एका युजरने टिप्पणी करताना लिहिले की २०१९च्या टेलेव्हिजन युगाची तुलना २०२६च्या डिजिटल युगाशी करणे योग्य नाही.

बिग बॉसमध्ये अनेक सेलिब्रिटीज

‘बिग बॉस २०’चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबरला शानदार पद्धतीने झाला. यावेळी घरात मेरी कॉम, कनिका मान, माही विज, भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे, ‘पंचायत’ फेम आसिफ खान, ईशा रिखी, काजी तौकीर, रोडीज विनर कुशाल तंवर (गुल्लू), अरिश्फा खान, अमन गांधी, उदिती सिंह, लव गिल, रॅपर यंग डी.एस.ए (हर्ष विजय मचारे), ई-गेमर स्काउट (तन्मय सिंह), रोहेद खान असे अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले आहेत. हा शो दररोज रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे आणि रात्री १०:३० वाजता टीव्हीवर ऑन एअर जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं
  • कितीही हल्ले झाले… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
  • Pune News: गजेंटींचा कहर, आता रेल्वे ट्रॅकवरच नको ते घडले, पुणे हादरले
  • Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…
  • दीपिका कक्करच्या नणंदेच्या घरात मोठी चोरी; सोन्याची चेन, डायमंड इअररिंग्स गायब, म्हणाली- ‘माझीच चूक…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in