• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातून बाहेर काढा या वस्तू, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

July 31, 2026 by admin Leave a Comment


आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान शिवाची पूजा, प्रार्थना आणि नामस्मरण केल्यास महादेव प्रसन्न होतात, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, घरात सुख, शांती येते अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्मातील अनेक सण देखील असतात. आपल्या घरातील लोकांना सुख, शांती लाभावी, घरात समृद्धी यावी यासाठी लोकं श्रावण महिन्यात विविध उपाय देखील करत असतात. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार वर्षभर आपल्या घरात अशा काही वस्तू जमा होत असतात, ज्या वस्तू श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घराच्या बाहेर काढाव्यात, यामुळे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

खंडित मूर्ती – जर तुमच्या देवघरात एखादी खंडित मूर्ती किंवा फोटो असेल तर असे फोटो देवघरात ठेवू नये, अशा मूर्ती किंवा फोटो हे वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. देवघरामध्ये कधीही खंडित मूर्ती किंवा फोटो असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा संबंध हा वेळेशी आहे. घड्याळाला गती आणि प्रगतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे अशा अवस्थेत घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्यामुळे तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे बंद पडलेली घड्याळं कधीही घरात ठेवू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

रद्दी, भंगार सामान – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात रद्दी किंवा भंगार सामान असेल तर ते देखील फार काळ घरात ठेवू नये, यामुळे सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते, ज्याचा परिणाम हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. जर घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात विविध अडचणी येऊ शकतात, त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunal Chandgude : म्हणायचा माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे अन्…, कुणालच्या आईचा पतीवर खळबळजनक आरोप, नवा Video
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे अडचणीत? नाशिकमध्ये केलेल्या कारवाईविरोधात व्यापारी थेट कोर्टात
  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in