• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

July 21, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, ज्यामध्ये तुळस, पिंपळ, उंबर आणि वड अशा काही झाडांचा समावेश होतो. वडाच्या झाडाचं अध्यात्मिक महत्त्व आहे. वडाच्या झाडाची नित्यनियमाने पूजा केल्यास आपल्याला ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या तीन देवांचे आशीर्वाद मिळतात, घरातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, आर्थिक भरभराट होते, असं मानलं जातं. वट पौर्णिमाच्या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून महिला या वृक्षाची पूजा करतात, वडाच्या झाडाला दीर्घायुष्याचं प्रतिक म्हणून देखील पाहिलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वडाचं झाड उगवलं असेल तर हे झाड विशिष्ट संकेत देते असते, चला तर मग जाणून घेऊयात हे संकेत नेमके काय आहेत? तसेच घरात वडाचं झाडं लावणं शुभ आहे की अशुभ? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार घरात वडाचं झाडं उगवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या घरात जर अचानक वडाचं झाडं उगवलं असेल तर तुमच्यावर भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव यांची कृपा झाली आहे, असं मानलं जातं. वडाच्या झाडाला दीर्घायुष्य आणि स्थिरतेच देखील प्रतिक मानलं जातं. जेव्हा तुमच्या घरात वडाचं झाडं उगवतं तेव्हा यातून असा संकेत मिळतो की आता लवकरच तुमची परिस्थिती बदणार आहेत, तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभणार असून तुमच्या आयुष्यात स्थिरता येणार आहे, तसेच तुमच्या घराला चांगलं आरोग्य लाभणार आहे. त्यामुळे घरात वडाचं झाडं उगवणं हे एक शुभ संकेत असल्याचं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

इच्छा पूर्ण होते- वास्तुशास्त्रात असं देखील म्हटलं आहे की, जर तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा जर तुम्ही वडाच्या एका पानावर लिहून ते पान वाहत्या पाण्यात सोडलं तर तुमची ती इच्छा पूर्ण होते. मात्र वडाच्या झाडाची वाढ ही अतिप्रचंड प्रमाणात होते, या झाडाचा विस्तार होतो. या झाडाच्या मुळांमुळे तुमच्या घराच्या भिंतींना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो हे झाड घरापासून थोड्या दूर अतंरावर असावं

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal flood: ब्रिज, डीएनए विश्लेषण टीम, अन्न… भारताने नेपाळसाठी आतापर्यंत काय पाठवले?
  • बजेट फक्त 2 कोटी, नफा तब्बल 800%! प्रेमानंद महाराजांचा सल्ला मानला अन् चित्रपट ठरला सुपरहिट
  • Nepal Flood: हिमालयीन तलाव बनले टाईम बॉम्ब! भारतालाही महापूराचा मोठा धोका?
  • Horoscope Today 30th August 2026 : स्वप्नपूर्तीच्या दिशेने मोठे पाऊल.. आजचा दिवस या राशीसाठी खासम् खास ! वाचा तुमचं भविष्य
  • अंतरवाली सराटीत लोकांची गर्दी वाढली, जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, जागा कमी पडत असल्याने रात्रीतच शेतकऱ्याने..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in