• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘Vasteguna Huiya’? म्हणजे काय रे भाऊ? Gen Z पोस्टर्सचा धुमाकूळ, अर्थ लावता लावता नुसती दमछाक

July 26, 2026 by admin Leave a Comment


Vasteguna Huiya Trending: भावा, जंतरमंतरवरील आंदोलन जणू प्रयोगशाळाच. काय ती सांकेतिक भाषा, हटके पोस्टर्स, मीम्स, रील्स नुसता गल्लाच ना राव. सर्व काही अल्फा आणि गामाच की. त्यात एका तरुणीने पोलिसांना पाहून ‘Vasteguna Huiya’ अशी काय हाक दिली की यंत्रणा चक्रावली. अख्खी डिक्शनरी धुंडाळली पण नेमका शब्दच गवसना. मग काय त्याचे मीम्स, रील्सने सोशल मीडियावर नुसता धिंगाणा घातला ना भौ. लोकांनी त्यावर अजून कमेंटचा पाऊस पाडला. यंत्रणा अजून गोंधळली. पण वास्ते गुन्ना हुईया ‘ चा नेमका अर्थ काय रे भाऊ?

कसा आणि कुठून सुरू झाला ‘Vasteguna Huiya’ ट्रेंड?

इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटरनुसार, हा ट्रेंड भारतीय नाहीच मुळी. इन्स्टा आणि टिकटॉकपूर्वी ना Vine नावाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अत्यंत लोकप्रिय होता. तिथे लोक अगदी काही सेकंदाचे एकदम गंमतीशीर व्हिडिओ पोस्ट करत. या व्हिडिओत एक क्लिप होती, त्यात एक मुलगा वारंवार “Can I get a Hoya?” असे म्हणत असे. लोकांनी तोच ट्रेंड पकडला. मग त्यावर सुरू झाल्या मीम्स, बरं हा ट्रेंड जगभर व्हायरल झाला.

इंटरनेटच्या जगात आला की राव पूर

अनेक वर्षांनी हा जुनाच व्हिडिओ पुन्हा उसळी घेऊन सोशल मीडियात असा काही आदळला म्हणाल की जाळ आणि धूर संगटच. लोक एकमेकांना बोलताना गंमतीत “Can I get a Hoya?” असेच म्हणू लागले. मग काय इंटरनेटवर त्याची लाट आली. धडामधूम व्हिडिओ पडू लागले. ही गंमत जगभर पसंतीला पडली. लोक त्यांच्या खास स्टाईल, अंदाजात हेच वाक्य वेगळ्या लकबी, लहेजात म्हणू लागली. त्याला तिथल्या स्लँगचा, मातीचा टच देऊ लागली.

भारतात कसे झाले व्हायरल?

जगभरातील व्हायरल व्हिडिओ भारताय सोशल प्लॅटफॉर्मवर आले की झाली ना भाऊ कॉपी पेस्टला सुरुवात. पण त्यात एका पोरानं कमाल केली. एका म्हतारबाबाशी बोलताना त्याने, “काका, वास्ते गुन्ना हुईया” असा शब्दा टोलावला आणि तोच ट्रेंडिंगमध्ये आला ना भौ. पण त्याचा अर्थही “Can I get a Hoya?” असाच बरं का. त्याला या भावड्याने देशी टच दिलं इतकंच. हा व्हिडिओ भारतातील Gen Z आणि Alpha पिढीनं असा की टकुऱ्यावर घेतला म्हणाल की सोशल मीडियावर जो तो “वास्ते गुन्ना हुईया” असेच रील्स, मीम्स शेअर करू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanyukta (@dramadhikari)

पण भावड्या अर्थ तरी काय?

तर सोशल मीडियावर विकणारं सारं काही सोनं थोडीचं असतं. तसा या वास्ते गुन्ना हुईया याला चपखल अर्थ नाही भावा. एक मजेदार संवाद आहे. तुम्ही तो कसा उच्चारता आणि त्याला कसा लोकल टच देता यावर त्याची खरी गंमत आहे. लोक मीम्ससाठी, पोस्टर्ससाठी आणि रील्ससाठी त्याचा वारेमाप वापर करत आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर तर अशा शब्दांची, संवादाची रेलचेल पाहायला मिळाली. पोस्टर्सनी तर धमाका उडवला. मीम्सने तर कहर केला. या आयुधांनी पोलिसांची झोप उडवली. तातडीने जंतरमंतरवरील इंटरनेट सेवा बंद केली. बरं इथं देशभरातील भाषिक खिचडी तयार झाली. त्याचेही प्रयोग जंतरमंतरवर दिसले. जे जंतरमंतरवर या काळात होते, त्यांनी अनुभवाचं भलंमोठा गाठोडं सोबत घेतलंय हे नाकारून नाही चालणार बरं का!

 

View this post on Instagram

 

A post shared by भारत (@pehchanpatar)





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in