• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : इंग्लंड विरुद्ध धावा करुन दाखव, वैभव सूर्यवंशीला कुणाकडून ओपन चँलेज?

June 25, 2026 by admin Leave a Comment


वैभव सूर्यवंशी याचं आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद याने वैभव सूर्यवंशी 21-22 वर्षांचा असल्याचं म्हटलंय. तसेच तन्वीर अहमद याने वैभवला ओपन चँलेज दिलंय. (Photo Credit: PTI)

Team India Vaibhav Sooryavanshi

तसेच तन्वीरने वैभवला इंग्लंड दौऱ्यात धावा करुन दाखवाव्यात, असं आव्हान दिलं आहे. “भारतातील पाटा पीचवर धावा करणं सोपं आहे. मात्र इंग्लंडमध्ये जेव्हा बॉल मिडल स्टंपच्या बाहेरुन स्विंग होईल तेव्हा वैभवची पोलखोल होईल”, असं तन्वीरने म्हटलं. (Photo Credit: PTI)

Vaibhav Sooryavanshi List A Career

वैभवने इंग्लंड दौऱ्यात धावा केल्या तरच त्याच्यात प्रतिभा आहे हे मी मान्य करेन. वैभव भारताच्या खेळपट्टींवर धावा करत आहे. वैभव जेव्हा परदेशात खेळेल तेव्हा दूध का दूध, पानी का पानी होईल”, असं तन्वीरने म्हटलं. (Photo Credit: PTI)

Vaibhav Sooryavanshi International Debut

वैभवचं अचूक वय जाणून घेण्यासाठी आवश्यक चाचणी करण्यात आल्याचं तन्वीरला सांगण्यात आलं. मात्र त्यानंतरही तन्वीरने ही बाब मान्य करण्यास नकार दिला. “वैभवची ही चाचणी भारतातच झाली आहे ना. वैभवची चाचणी बाहेर कुठे झालेली नाही”, असं तन्वीरने म्हटलं. तसेच ऑस्ट्रेलियातील फॉक्स या वाहिनीनेही वैभव 15 वर्षांचा नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. जो क्रिकेट खेळलाय त्याला निश्चितच वैभव 15 वर्षांचा नसल्याचा संशय येईल. हिमंत असेल तर वैभवची विदेशात चाचणी करावी”, असं म्हणत तन्वीरने आव्हान दिलं. (Photo Credit: PTI)

Tanveer Ahmad on Vaibhav Sooryavanshi

तन्वीरची असूया पाहता त्याला वैभवची कामगिरी आणि यश पाहवत नसल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आता वैभव आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit: YT SCREENSHOT)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा
  • तर मी मरून जाईन, कोणासोबतच इंटिमेट होऊ शकत नाही, अभिनेत्रीने पहिल्यांदाच हकिकत सांगितली; त्या आरोपांवर स्पष्टीकरण!
  • नेपाळमध्ये महापुराने महाविध्वंस, भारतातील या राज्याला तातडीचा हाय अलर्ट; प्रशासन लागले कामाला!
  • boAt ने भारतात लाँच केले 8 नवीन स्पीकर्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in