• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video

August 26, 2026 by admin Leave a Comment


कडक्याचं ऊन पडलेलं असताना, पावसाचा एकही थेंब नसताना नेपाळमध्ये जलप्रलय आला. कधीही कुणीही पाहिला नसेल असा महाभयंकर जलप्रलय झालाय. या जलप्रलयाचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतंय. हवेच्या वेगाने पाणी आलं अन् पूल, टॉवर, इमारतीसहीत सर्वच वाहून नेलं. गावच्या गावं वाहून गेली. घरं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. शिल्लक आहे ते फक्त पाणी आणि गाळ. नागरिकांचा आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू. ज्या ज्या ठिकाणाहून पाणी वाहून गेलंय, तिथे फक्त उरल्यात उद्ध्वस्ततेच्या खूणा. या महाभयंकर जलप्रलयाचे असंख्य व्हिडीआ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर कापरे भरल्याशिवाय राहणार नाही, इतकं भीतीदायक दृश्य आहे.

 

भारतको उत्तर प्रदेशको बहराइच जिल्लामा रहेको कर्णाली (घाघरा) नदीको ड्याममा नेपालबाट हात्तीहरू बगेर गएको भिडियो अहिले सामाजिक सञ्जालमा भाइरल बनेको छ। pic.twitter.com/UlXqvyRNhW

— @Birgunjse (@Birgunjse2000) August 26, 2026

तिबेटने वाट लावली…

तिबेटमधून आलेल्या या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. या जिल्ह्यात संपूर्ण दाणादाण उडाली आहे. हवेचा जेवढा वेग असतो त्या वेगाने नेपाळमध्ये पाणी आलं. येथील लेन्दे खोला (भाटेकोशी नदी)ला एवढा पूर आलाय की नदीचं असं रौद्ररूप पूर्वी कुणी कधीच पाहिलं नसेल. या नदीचं पाणी गावागावात घुसलं. त्यामुळे टिमुरे बाजार आणि रसुवाच्या सीमावर्ती भागात कस्टम विभागाचं मोठं नुकसान झालं आहे. पाण्याबरोबर वाहने आणि इतर सामान काडी कचऱ्यासारखं वाहून गेलं आहे. या महापुरामुळे वस्त्यांचं तर नुकसान झालंच, पण जलविद्यूत परियोजनेलाही मोठा फटका बसला आहे.

 

नेपाल में बाढ़ की भयंकर स्थिति। बिहार पर भी खतरा। pic.twitter.com/KU9ofOs2nr

— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) August 26, 2026

सकाळी 9 वाजता काळ आला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता तिबेटमधून अचानक महापूर आला. हा महापूर इतका महाभयानक होता की सर्व सामान वाहून गेलं. घरंदारं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच उरलं नाही, असं स्थानिकांनी म्हटलंय. पाण्याचा फ्लो अचानक वाढल्याने रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि समीपवर्ती स्याफ्रुबेसी परिसरात मोठं नुकसान झालं. पाण्याबरोबर सर्वच साधन संपत्ती गेली. इमारती, पूल आणि टॉवरही वाहून गेल्याचं नेपाळी सैन्याचं म्हणणं आहे.

 

हेलिकोप्टरबाट देखिएको रसुवाको बाढी pic.twitter.com/K2xijwQV79

— Kantipur TV HD (@KantipurTVHD) August 26, 2026

5 जिल्ह्यांवर हाय संकट

रसुवा जिल्हा हा काठमांडूच्या उत्तर पूर्वेला आहे. या जिल्ह्यापासून तिबेटची सीमा केवळ 125 किलोमीटर दूर आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती विभागाने रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या एकूण पाच जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आले आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in