• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?

August 26, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. या सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पण या सामन्यात ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही. कारण त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे आणि वेदना तीव्र होत असल्याने विकेटकिपींग करू शकत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे. असं असताना तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. तेव्हा दुखापतग्रस्त ऋषभ पंत पावसाचा आनंद लुटताना दिसला. सर्व खेळाडू मैदानाबाहेर आडोशाला गेले असताना ऋषभ पंत मात्र पावसाच्या सरींचा आनंद लुटत भिजत होता. यावेळी ऋषभ पंत आणि स्टँडमध्ये बसलेल्या एक चाहत्याचा संभाषणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मैदानात नेमकं काय घडलं?

ऋषभ पंतला पावसात भिजताना पाहून एका चाहत्याने व्हिडीओ शूट करत म्हंटलं की, ‘ऋषभ भाई.. खूप भीजू नको, ताप येईल. कारण इथलं पाणी आणि हवामान थोडं वेगळं आहे.’ चाहत्यांच्या या प्रेमळ सल्ल्यावर ऋषभ पंतनेही आपल्या शैलीत उत्तर दिलं. ऋषभ पंत म्हणाला की, ‘तू मला ताप भरवूनच इथून जा… जर नाही आला, तरीही कसा येईल ते बघ!’ ऋषभ पंतचा हा हजरजबाबीपणा पाहून व्हिडीओ शूट करणारा चाहताही हसू लागला आणि म्हणाला, ‘नाही, नाही भाई… असं नका म्हणू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो!’

Rishabh Pant fully enjoying the Rain in Sri Lanka 🤣🔥

Fan: Rishabh bhai… Bukhar ho jayega. Idhar ka pani alag hai.

Pant: Bukhaar Karva ke hi jana tum… Nahi hoga to bhi karva dena. 😄

Fan: Nahi, Nahi bhai… We love you bhai. pic.twitter.com/lvznJOHGkX

— Jara (@JARA_Memer) August 25, 2026

ऋषभ पंत दुखापतग्रस्त

ऋषभ पंतला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच फलंदाजी करताना दुखापत झाली. त्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतावं लागलं होतं. पण त्यानंतर वेदनाशामक औषधं घेऊन पुन्हा मैदानात उतरला होती. यावेळी त्याने 89 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 63 धावांची खेळी केली. मात्र दुखापतीमुळे वेदना तीव्र जाणवू लागल्याने क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. इतकंच काय तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू असताना ऋषभ पंत उजव्या खांद्यावर निळ्या रंगाचा एडव्हान्स्ड आइस काँप्रेशन रॅप बांधून फिरत होता. आता त्याची दुखापत किती तीव्र आणि दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरेल का? हा प्रश्न आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
  • नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • Nepal Flood: त्याची अखेरची धाव व्यर्थ… हॉटेलमधून बाहेर पडताच पूराच्या तडाख्यात, तो Video पाहून सर्रकन अंगावर काटा
  • 44 वर्षांपूर्वीचं हे प्रेमपत्र आजही मनात घर करतं; लता मंगेशकरांच्या आवाजातील या गाण्यामागची भन्नाट गोष्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in