
हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील काही गाणी इतकी सुंदर, इतकी सुमुधुर आहेत की ती ऐकूनच चेहऱ्यावर हास्य येतं आणि ओठ आपोआप ते गाणं गुणगुणायला लागतात. 44 वर्षांपूर्वी आलेला ‘शक्ति’ चित्रपट खूप गाजला आमि त्यातली गाणीही. त्याचं चित्रपटातील एक खास गाणं म्हणजे, ‘हमने सनम को खत लिखा’. जुन्या जमान्यातील हे गाणं आजंही अनेक रोमँटिक लोकप्रिय गाण्यापैकू एक आहे. या गाण्यातील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यातलं प्रेम पत्र… खास अशासाठी कारण पत्र लिहीणाऱ्याला पत्ताच ठावूक नाहीये ना… लता मंगेशकरांचा सुमधुर आवाज, आनंद बक्षी यांचे सुंदर बोल आणि आर.डी. बर्मन यांनी दिलेलं कर्णधुर संगीत, यामुळे या गाण्याला चार चाँद लागले आणि ते न विसरण्याजोगं ठरतं. मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या केमिस्ट्रीने गाणं आणखीनच सजलं आणि सुरेखरित्या पडद्यावर उमटलं.
पत्ताच नाही, तरी प्रेमपत्र !
‘हमने सनम को खत लिखा’ या गाण्याची कथा खूपच अनोखी आहे. यात प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र लिहितो, पण ते पत्र नेमक्या कोणत्या पत्त्यावर पाठवायचं, हेच त्याला माहीत नसतं. गाण्याच्या बोलांतून हीच गंमत आणि रोमँटिक गोंधळ अतिशय मजेशीर पद्धतीने मांडली आहे. पत्र पोस्टात टाकल्यानंतरही प्रतीक्षा संपत नाही आणि शेवटी ते पत्र परत येतं, कारण असा कोणताही पत्ता अस्तित्वातच नसतो. हीच गोष्ट या गाण्याला इतर प्रेमगीतांपेक्षा अगदी अनोखी, वेगळी बनवते .
लता मंगेशकर यांचे सूर अन्
या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. गाण्याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले, तर संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं होतं. सुमारे 4 मिनिटं 10 सेकंदांचं हे गाणं चित्रपटात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. दोघांची साधी आणि सहज केमिस्ट्री या गाण्याचे सौंदर्य आणखी वाढवते. ‘शक्ती’च्या संगीतामध्ये ‘जाने कैसे कब कहां इकरार हो गया’ यांसारखी इतर लोकप्रिय गाणीही होती.
शक्तिची कहाणी आणि बॉक्स ऑफीस कलेक्शन
शक्ति चित्रपटाचं दिग्दर्शन हे रमेश सिप्पींनी केलं तर स्क्रीनप्ले सलीम-जावेद यांच्या जोडीने लिहीला. या चित्रपटात दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राखी, स्मिता पाटिल, कुलभूषण खरबंदा आणि अमरीश पुरी यांसारखे एकाहून एक मोठे कलाकार होते. या चित्रपटात दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा एकत्र आणि एकदाच काम केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर खूप .श मिळाल नाही, पण समीक्षकांनी चित्रपट खूप नावाजला.
Leave a Reply