• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तर मी मरून जाईन, कोणासोबतच इंटिमेट होऊ शकत नाही, अभिनेत्रीने पहिल्यांदाच हकिकत सांगितली; त्या आरोपांवर स्पष्टीकरण!

August 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री गेहना वशिष्ठने शोबिजमधील आपल्या संघर्षाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपट, ब्रँड शूट्स, टीव्ही शो आणि अँकरिंगच्या माध्यमातून तिने मनोरंजन क्षेत्रात सुरुवात केली. मात्र, काम मिळवण्यासाठी तिला वारंवार कास्टिंग काऊचशी संबंधित प्रस्तावांचा सामना करावा लागला. अखेर परिस्थिती बिकट झाल्यानंतर आपण एरॉटिक शोजकडे वळल्याचं तिने सांगितलं. ‘गंदी बात’ आणि ‘उल्लू’वरील शोजमुळे तिला ओळख मिळाली; मात्र त्या निर्णयाचा आजही पश्चात्ताप होत असल्याचं तिने स्पष्ट केलं.

एजाज खानसोबतच्या संवादादरम्यान गेहनाने इंडस्ट्रीतील त्या काळातील अनुभव सांगितला. “काम देणारं कोण होतं? कोणीच नाही. ज्याला भेटावं तो हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी भेटायला बोलवायचा. सगळीकडे फक्त कास्टिंग काऊचच्या गोष्टी होत्या,” असं तिने म्हटलं.

गेहनाने पुढे सांगितलं की, आरोग्याच्या समस्यांमुळे अशा प्रकारच्या तडजोडी करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. ती डायबेटीसने त्रस्त असून त्या काळात तिचं वजन अवघं 46 ते 49 किलो होतं. त्यामुळे ती शारीरिकदृष्ट्याही खूप अशक्त होती, असं तिने सांगितलं. “मी इतकी मजबूत नव्हते की कोणासोबत झोपू शकेन. जे मला खरंच ओळखतात, त्यापैकी कोणताही पुरुष असा दावा करू शकत नाही की तो माझ्यासोबत इंटिमेट झाला होता,” असा दावाही गेहनाने केला.

डायबेटीसमुळे सतत भीती

आपल्या आरोग्याविषयी बोलताना गेहनाने सांगितलं की, तिला गंभीर स्वरूपाचा डायबेटीस आहे आणि दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घ्यावं लागतं. “मी दिवसातून चार-चार वेळा इन्सुलिन घेते. काही करण्यासाठी गेले आणि बेडवरच माझा मृत्यू झाला तर?” अशी भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं.

कास्टिंग काऊचला नकार दिल्यानंतर साइडलाइन केल्याचा आरोप

कास्टिंग काऊचला नकार दिल्यानंतर आपल्याला थेट कामावरून काढून न टाकता साइडलाइन केलं जात असल्याचाही आरोप गेहनाने केला. कधी चेहऱ्यावर योग्य प्रकाश टाकला जात नसे, तर कधी मुद्दाम दुर्लक्ष केलं जात असल्याचं तिने सांगितलं. “मला समजत नव्हतं की काय करावं. काम कसं करावं? घरी परतही जाता येत नव्हतं आणि कॉम्प्रोमाइज करण्याची माझी परिस्थितीही नव्हती. माझा असा कोणताही शुगर डॅडी नव्हता, जो माझी काळजी घेईल,” असं ती म्हणाली.

त्या एका स्टेपने माझं संपूर्ण करिअर बदललं

या परिस्थितीत एरॉटिक शोज करणं हाच आपल्यासमोर उरलेला पर्याय होता, असं गेहनाने सांगितलं. मात्र, या निर्णयाचा आजही तिला पश्चात्ताप होतो. “त्या एका स्टेपने माझं संपूर्ण करिअर बदलून टाकलं. मी कोण आहे, माझी सुरुवात कुठून झाली हे लोकांना जाणून घ्यायचं नसतं. मी एखाद्या मुलाशी बोलले तरी त्याला माझा फायदा घेण्याचा विचार येतो,” अशी खंत तिने व्यक्त केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट
  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in