
बिहारला लागून असलेल्या नेपाळमध्ये महापूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले असून हजारो लोकांवर याचा परिणाम झाला आहे. नेपाळमध्ये पुराची परिस्थिती गंभीर होत असताना त्याचा परिणाम बिहारवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहारमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रशासन लागले कामाला
संभाव्य पुराच्या पार्श्वभुमीवर बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पूरस्थिती आणि संभाव्य धोक्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (DM) तसेच पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते. नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply