
लहानांपासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा, मुंबईकरांचं लाडकं खाद्यं असलेला पदार्थ म्हणजे वडापाव. गरमा-गरम वडा, मऊ लुसलुशीत पाव आणि त्यासोबत चटणी, मिरची… हे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. स्वस्त, पोटभर आणि अप्रतिम चवीचा वडा पाव हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून मुंबईच्या वेगवान जीवनशैलीचे आणि समृद्ध स्ट्रीट फूड संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. ( All Photos : Getty Images)
वडा पावचा जन्म १९६० च्या दशकात मुंबईत झाला. त्या काळात कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कमी खर्चात, सहज सोबत नेता येईल असा आणि पोटभर आहार मिळावा या उद्देशाने रस्त्यावरील विक्रेत्यांनी वडा पाव तयार करण्यास सुरुवात केली.
मसालेदार बटाट्याचा वडा आणि मऊ पाव यांचे साधे पण स्वादिष्ट मिश्रण अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरले. कालांतराने वडा पाव मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूड बनला.
आज तो केवळ रस्त्यावरील गाड्यांवरच नव्हे, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि देश-विदेशातील भारतीय कॅफेमध्येही मोठ्या आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे अनेकजण वडा पावला “महाराष्ट्राचा अभिमान” असेही म्हणतात.
पण या वडापावला इंगर्जीत काय म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? जागतिक पातळीवर आणि इंग्रजीत वडापाव हा “Indian Burger” किंवा “Spicy Potato Burger” या नावाने ओळखला जातो. पण जगभरात तो वडापाव याच नावाने जास्त प्रसिद्ध आहे,
वडा पावचा मुख्य आकर्षण म्हणजे बटाटा वडा. उकडून कुस्करलेल्या बटाट्यामध्ये कांदा, लसूण, आले, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हळद आणि विविध मसाले घालून चवदार सारण तयार केले जाते. या सारणाचे गोल गोळे करून त्यांना बेसनाच्या पिठाच्या घोळात बुडवले जाते आणि नंतर गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळले जाते. त्यामुळे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, स्वादिष्ट व मसालेदार असा वडा तयार होतो, हीच वडा पावची खरी ओळख आहे.
मऊ, ताज्या पावामध्ये गरमागरम बटाट्याचा वडा ठेवून त्यासोबत विविध चटण्या आणि कधीकधी तळलेली हिरवी मिरची दिली जाते. खवय्ये, खूप आवडीने हा पदार्थ, मिटक्या मारत खातात.






Leave a Reply