
टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोलाने 'लॉक अप 2'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. पती आणि अभिनेता गौरव खन्नासोबतच्या नात्यातील तणाव, घटस्फोट आणि तिच्या सेक्शुएलिटीबद्दल तिने शोमध्ये भाष्य केलं होतं. आकांक्षाने बायसेक्शुअल असल्याचं सांगितल्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत मोठी चर्चा झाली.
आता आकांक्षाने तिच्या या वक्तव्यावर गौरव खन्ना आणि त्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत तिला याबद्दल विचारण्यात आलं. मात्र गौरवच्या आईवडिलांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली, हे आपल्याला माहिती नसल्याचं आकांक्षाने स्पष्ट केलं.
आकांक्षाने सांगितलं की सध्या तिचं गौरवच्या आईवडिलांशी बोलणं होत नाही. त्यामुळे बायसेक्शुअल असण्याच्या खुलाशावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली, याची तिला कल्पना नाही. आमच्यात बोलणंच होत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या वक्तव्यावर कसं रिअॅक्ट केलं हे मला माहीत नाही, असं ती म्हणाली.
स्वत:च्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना आकांक्षाने म्हटलं की, पालक आपल्या मुलांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सहजपणे काही बोलत नाहीत. तिच्या मते “आपले पालक आपलेच असतात. कोणता पालक आपल्या मुलाला काही म्हणेल” असं ती पुढे म्हणाली.
आकांक्षाने 'लॉक अप 2'मध्ये सांगितलं होतं की, लग्नाआधीच तिला महिलांबद्दल आकर्षण असल्याची जाणीव होती आणि तिचे महिलांसोबत काही संबंधही होते. दरम्यान, आकांक्षाने शोमध्ये गौरव खन्नासोबत विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. दोघांनी काही काळापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचंही समोर आलं आहे.





Leave a Reply