
Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार सध्या देशभरात फिरत आहेत. जेन झी आणि तरुणाईचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आतापर्यंत देशभरात ‘छात्रों की गूंज’ नावाने कार्यक्रम घेतले. पुण्यातही त्यांचा हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम फक्त तरुणी आणि विद्यार्थिनींसाठीच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असे असतानाच आता सोशल मीडियावर ‘Jhooth Ki Goonj’ नावाचे संकेतस्थळ सध्या चर्चेत आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात चुकीचे दावे करण्यात आले आहेत, असा दावा या संकेतस्थळावर करण्यात आलाय.
40 दाव्यांची आम्ही पडताळणी केली
Jhooth Ki Goonj या संकेतस्थळावर अनेक दावे करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी केलेले एकूण 40 दाव्यांची आम्ही पडताळणी केली आहे. वेगवेगळ्या 134 स्त्रोतांच्या आधारे आम्ही ही माहिती पडताळणी केली आहे, असं या संकेतस्थळावर सांगण्यात आलंय. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून झाली होती. त्यानंतर देहरादून, प्रयागराज येथे हा कार्यक्रम झाला. 22 ऑगस्ट रोजी पुण्यातही हा कार्यक्रम झाला होता. पुण्यातील कार्यक्रमात फक्त विद्यार्थिनी आणि तरुणीच होत्या.
झूट की गुंज नेमकं काय आहे
Jhooth Ki Goonj हे एक संकेतस्थळ आले. यावर Four rallies. Forty claims. One answer key असं इंग्रजीत म्हणण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी ज्या शहरात कार्यक्रम घेतला, त्या शहराच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर राहुल गांधी यांनी केलेले दावे आणि त्यांनी त्यांच्या दाव्यावरील कथित सत्य दिसायला लागते.
हे संकेतस्थळ नेमके कोणी सुरू केले?
सध्या सोशल मीडियावर Jhooth Ki Goonj या संकेतस्थळाची चर्चा होत आहे. परंतु हे संकेतस्थळ कोणी सुरू केले याबाबत अनेक मतमतांतरं आहेत. काही लोक ही वेबसाईट ही Gen Z तरुणींनी सुरू केली आहे, असा दावा करत आहेत. तर काही तरुणांनी एकत्र येत हे संकेतस्थळ सुरू केल्याचे सांगितले जातेय. परंतु हे दावे नेमके किती खरे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हे संकेतस्थळ सुरू करण्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज कार्यक्रमाअंतर्गत देशभरातील वातावरण ढवळून काढलेले असताना झूट की गूंज नावाच्या संकेतस्थळाचीही तेवढीच चर्चा होत आहे.
Leave a Reply