
कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला अखेक शनिवारी अखेर यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलं. त्याचं सेलिब्रेश करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधुंनी जल्लोष सभा आयोजित केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेंझनी या सरकारच्या झिंजा उपटल्या… असं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला, एका झुरळाने हुकूमशाहाला नमवलं… असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, एका झुरळाने हुकूमशाहाला नमवलं.. तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला काढताना किती यातना झाल्या लगेच आम्हाला विचारतात निवडणुकीला तीन वर्ष आहे आहेत… निवडणुका गेल्या खड्ड्यात…मोदींनी पाहिलं मत चोरी करता येतात, माणसं चोरी करता येत नाहीत…मनं चोरता येत नाही, ही मनं आता पिसाटलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे…. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत… असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सांगायचं झालं तर, नीट पेपरफुटीनंतर जवळपास 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. यानंतर दिल्ली येथेल जंतर – मंतर येथे सीजेपीने आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं राहत सोनम वांगचुक उपोषणासाठी बसले.
त्यानंतर 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. अखेर या मोर्चाला देशव्यापी आंदोलनाचं स्वरुप प्राप्त झालं. सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.




Leave a Reply