• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe : ‘सावजी’च्या वादानंतर तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले.. “माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण..”

August 7, 2026 by admin Leave a Comment


अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती इथल्या एका कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध सावजी जेवणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. “मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन”, असं ते म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या. “जगातील अनेक देशात सावजीची मागणी केली जाते. त्यांच्या व्यवसायाला बळीचा बकरा करू नका. घरातील जेवण रेस्टॉरंटमध्ये आणलं जात आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर आता एका पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत “माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही”, असं म्हटलंय.

काय म्हणाले तुकाराम मुंढे?

“तुम्ही माझं वक्तव्य पुन्हा ऐका. सावजी मी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं मी म्हटलं होतं. यात दुसऱ्यांनी खाल्ल्यावर ते आजारी पडतील किंवा कुणी खा, नका खाऊ असं काहीच म्हटलेलं नाही. यामागचं कारणही मी तुम्हाला सांगतो. 2008-09 मध्ये एका मित्राने मला बळजबरी ओढून सावजी खाण्यासाठी नेलं होतं. पण ते लाल आणि भरपूर तेल पाहून मी घास खाऊनच उठलो. मला ते खूप तेलकट आणि तिखट वाटलं. पण मी कुणी खाऊ नये असं म्हटलेलं नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर माफीचा प्रश्नच येत नाही,” असं तुकाराम मुंढे म्हणाले.

सावजी मटण

नागपुरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हटलं की ‘सावजी मटण’ हे नाव प्रत्येकाच्या तोंडी असतंच. नागपूर, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सावजी मटणाची लोकप्रियता आहे. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. सावजी मटणाची खरी ओळख म्हणजे त्यातील मसाले आणि चव. ‘सावजी’ हा शब्द सावजी समाजाच्या पाककलेशी जोडला जातो. अतिशय तिखट, सुगंधी आणि गडद रंगाचा मसाला, ही याची खासियत. धणे, खोबरं, खसखस, काळी मिरी, दालचिनी, लवंत, दगडफूल, वेलची यांसारखे गरम मसाले भाजून हा मसाला तयार केला जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी, गोंधळ झाल्याने… नेमकं काय घडलं?
  • Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट
  • Vaibhav Sooryavanshi: नाद करतो काय! कॅप्टन्सी मिळताच वैभवचा मैदानात धुरळा, थेट अंपायरला खोटं ठरवलं, Video Viral
  • या खास तारखांना जन्मलेले लोकं असतात जिद्दी, कोणत्याही परिस्थितीत मिळवतात यश
  • टॉवेल वापताना कोणती काळजी घ्याल, किती वेळा स्वच्छ पाण्यात धुवाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in