
अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. काही लोकं फारसे शिकलेले नसले तरी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवतात. अशा लोकांना कितीही अडचणी आल्या तरी ते सहज हार मानत नाहीत. दुसरीकडे, काही जण एक-दोन वेळा अपयश आलं की प्रयत्न सोडून देतात. मात्र काही व्यक्तींची वृत्ती यापेक्षा अगदी वेगळी असते. वारंवार अपयश आलं तरी त्या पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत राहतात आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबत नाहीत. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत आणि धैर्याचे गुण अधिक असल्याचे मानले जाते. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी या व्यक्ती प्रयत्न करणे सोडत नाहीत. चला तर मग कोणत्या खास तारखांना जन्मलेल्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात ते जाणून घेऊयात.
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक 1 असतो. या मूल्यांकवर ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्याचे अधिपत्य असल्याचे मानले जाते. सूर्याच्या प्रभावामुळे मूलांक 1 असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे या व्यक्ती अनेकदा नेतृत्वाची भूमिका घेताना दिसतात. अगदी औपचारिक पदावर नसले तरी त्यांच्या स्वभावात नेतृत्वाची झलक दिसून येते.
या व्यक्तींची खासियत म्हणजे अडचणी आल्या म्हणून त्या सहज खचत नाहीत. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर मात करण्याचा मार्ग शोधण्यावर त्यांचा भर असतो. एकदा एखादं ध्येय ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती असते. त्यामुळेच मूलांक 1 असलेल्या व्यक्तींना जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि ध्येयावर ठाम राहणारे मानले जाते.
अंकशास्त्र तज्ञ सांगतात की, कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक 4 असतो, ज्यावर राहू या ग्रहाचा अधिपती असतो. मूल्यांक 4 असलेली लोकं शिस्तप्रिय आणि दृढनिश्चयी असतात. ते रातोरात मिळणाऱ्या यशावर विश्वास ठेवत नाहीत. त्याऐवजी कठोर मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्यावर त्यांचा भर असतो. एकदा एखादे काम हाती घेतल्यावर ते कधीही सोडत नाहीत आणि ते पूर्ण झाल्यावरच पुढचे ध्येय निवडतात.
महिन्याच्या 7,16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक 7 असतो, ज्यावर केतूचा प्रभाव असल्याचे मानले जाते. मूल्यांक 7 असलेल्या व्यक्ती मनाने बलवान असूनही त्या शांत आणि विचारशीलही असतात. कोणत्याही परिस्थितीत लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या आधी परिस्थिती समजून घेतात आणि विचारपूर्वक निर्णय घेतात आणि नव्या आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी करतात.
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक 8 असतो, ज्यावर शनीचा प्रभाव असल्याचे मानले जाते. अंक 8 असलेल्या व्यक्तींना या व्यक्ती जिद्दी, मजबूत इच्छाशक्तीच्या आणि संकटातही मार्ग शोधणाऱ्या असतात. अडचणी कितीही आल्या तरी त्या सहज हार मानत नाहीत. तात्पुरत्या अपयशानंतरही दीर्घकाळाच्या यशावर लक्ष ठेवून सतत प्रयत्न करत राहतात.
अंकशास्त्रानुसार, 9,18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूल्यांक 9 असतो. या अंकावर ग्रहसेनापती मंगळाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे या व्यक्ती धाडसी, जिद्दी आणि खंबीर स्वभावाच्या असतात. आपल्या कुटुंबासाठी आणि स्वप्नांसाठी त्या कोणत्याही परिस्थितीत उभ्या राहतात. एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात. बदल घडवून आणण्याची आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची त्यांची इच्छा असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply