
भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळत आहे. आजा वैभवकडे संघाची कमान सांभाळण्याची भूमिका होती. सेमीफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात वैभवकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आता 15 वर्षीय वैभवने ही कर्णधारपदाची जबाबदारी अत्यंत हुशारीने हाताळली. वैभवने थेट अंपायरच्या निर्णयाला आव्हान दिले आणि नंतर जे झालं त्याने सर्वच पाहत बसले.
बंगळूरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पूर्व विभागाचा सामना मध्य विभागाशी झाला. रविवारी, सामन्याच्या पहिल्या दिवशी, नियमित कर्णधार इशान किशनला यष्टीरक्षण करताना मनगटाची दुखापत झाली. परिणामी, उपकर्णधार वैभवने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपद स्वीकारताना वैभवने जो निर्णय घेतला तो त्याचा संघासाठी फारच उपयोगी ठरला.
Stand-in Captain Vaibhav Sooryavanshi goes for the review with 3 seconds remaining…and gets it right
DRS done right as the set Aryan Juyal (46) is dismissed
The celebrations say it all
#DuleepTrophy pic.twitter.com/IwBQbr8hJQ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 30, 2026
काही सेकंदातच खेळाचे चित्र पालटले. मुकेश कुमार डावाचे ४० वे षटक टाकत होते. त्याच्यासमोर आर्यन जुयाल होता, जो आधीच स्थिरावला होता. तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता. मुकेशने षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेवर टाकला आणि आर्यन चकवला. ईशानच्या जागी यष्टीरक्षण करणाऱ्या कुमार कुशाग्रने झेल घेतला आणि अपील केले. पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या वैभवनेही अपील केले. मुकेश कुमारनेही अपील केले, पण पंचांनी त्याला बाद दिले नाही. नंतर वैभवने थेट पंचाच्या निर्णायाला आव्हान दिले.
वैभवला पूर्ण आत्मविश्वास होता, पण त्याने मुकेशशी बोलून रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू आर्यनच्या बॅटची कडेला लागून आत आला. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. आर्यनने सहा चौकारांसह ११३ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या होत्या. त्याच्या बाद होण्याने सेंट्रल झोनची धावसंख्या ९९ धावांवर चार गडी बाद अशी झाली.
चेंडू बॅटला लागला होता हे रिव्ह्यूने निश्चित होताच वैभव आणि संपूर्ण संघ सेलिब्रेशन करु लागले. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या रिव्ह्यूमधील यशाचा आनंद वैभवच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या रिव्ह्यूमुळे सेंट्रल झोनने एक स्थिरावलेला फलंदाज गमावला आणि ईस्ट झोनला एक मोठी विकेट मिळाली.



Leave a Reply