• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: ते काहीही करू शकले असते पण..; तुकाराम मुंढेंना पाहून निलेश साबळेंना आली बाबांची आठवण, सांगितला परीक्षेतील कॉपीचा किस्सा

September 9, 2026 by admin Leave a Comment


Tukaram Mundhe: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर आल्यानंतर अनेक खाद्यपदार्थांमधील भेसळ, स्वच्छतेचा अभाव, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन याविरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली. त्यांच्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता मराठी अभिनेते आणि सूत्रसंचलाक निलेश साबळे यांनी तुकामार मुंढे यांना पाहिल्यानंतर मला माझ्या वडिलांची आठवण आली… असं ते म्हणाले. एवढंच नाही तर, त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

एका मुलाखतीत निलेश साबळे म्हणाले, ‘तुकाराम मुंढे साहेबांना पाहिल्यानंतर मला माझ्या वडिलांची आठवण येते. माझे बाबा शिक्षण अधिकारी होते. त्यांनी अधिक जिल्हे सांभाळले आहेत. माझे वडील देखील काहीही करु शकले असते, पण त्यांनी काही केलं नाही.’, यावेळी निलेश साबळे यांनी 10 वीचा किस्सा सांगितला.

निलेश साबळे म्हणाले, ‘मी 10 वीला असताना परीक्षा केंद्रावर खूप कॉपी चाललेली. बाबांची ट्रान्सफर दर दोन वर्षांनी व्हायची. त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं, आला संसार विंचवाच्या पाठीवरच्या बिऱ्हाडासारखा आहे… शाळा सतत बदलत राहतील, त्यामुळे तुम्ही तयार राहा… माझ्या भावाला आणि मला त्याची सवय झालेली.’

‘जेव्हा मी 10 वीच्या परीक्षासाठी बसलेलो, तेव्हा वडिलांनी सांगितलेलं, चांगले गुण मिळव. माझे वडील स्वतः MPSC होते. मी अनेक कॉपी पाहिल्या आहेत. माझे वडील भरारी पथकात होते. परीक्षा केंद्रावर वडील यायचे… सगळं तपासायचे… तासभर सगळं शांत असायचं… पण ते गेल्यानंतर पुन्हा कॉपी सुरु करायचे. हे पाहिल्यानंतर मला प्रचंड चीड आली.’

पुढे निलेश साबळे म्हणाले, घरी गेल्यानंतर मी बाबांवर प्रचंड चिडलो, त्यांना बोललो, तुम्ही साहेब आहात, तुम्ही माझ्यासाठी काहीही करु शकता… असं मी त्यांना म्हणालो. तेव्हा त्यांनी माझ्या हातात चाव्या दिल्या आणि सांगितलं, ‘तुम्ही जे पेपर लिहिता, ते ज्या कस्टडीमध्ये जमा होतात, त्या कस्टडीच्या चाव्या आहेत. मी संध्याकाळी आल्यानंतर तिला पेपर लिहियला देईल…’

‘पण एका पॉइंटला वडील रिटायर होतील, तेव्हा लक्षात ठेव, तू डॉक्टर होशील, पण पेशंट समोर आल्यानंतर वडिलांना फोन करायचा नाही. तुझी ओळख तुला स्वतःला निर्माण करण्याची आहे. युष्यात ज्या दिवशी प्रामाणिक राहशील, त्या दिवशीची संध्याकाळ छान जाईल. वडिलांनी कायम मला प्रामाणिक राहण्यास सांगितलं, माझ्या आयुष्यातील वडीलच माझे गुरु आहेत…’, असं निलेश साबळ मुलाखतीत म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क… जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
  • सीजेपीच्या आंदोलकाला 5 लाखाची नोटीस… मॅजिस्ट्रेटचा धक्कादायक निर्णय; सरन्यायाधीश भडकले
  • प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, तो आला अन् अंगावर झडप घातली, एकदा Video पाहाच
  • Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
  • MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in