• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्यावर सिंहाचा हल्ला, तो आला अन् अंगावर झडप घातली, एकदा Video पाहाच

September 9, 2026 by admin Leave a Comment


जंगलाचा राजा सिंह जर अचानक तुमच्या समोर आला तर? आपण इतके घाबरुन जाऊ की करावे आणि करु नये हे देखील आपल्याला सुचणार नाही. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता समोर येत असतो. तेवढ्यात त्याच्या मागे असलेल्या दोन सिंहांपैकी एक सिंह मागून अंगावर झडप घालतो. हा व्हिडीओ अभिनेत्याने स्वत: त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य स्टार अभिनेता किरण राज दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता काही सिंहांसोबत एका लॉयल सेंचुरीसारख्या जागेवर दिसत आहेत. तो आधी सिंहाला हात लावतो. पण नंतर जेव्हा तो परत यायला निघतो तेव्हा त्या दोघांमधील एक सिंह मागून सिंहावर झडप घालतो. सिंहाचा पंजा अभिनेत्याच्या खांद्यावर लागतो. त्यानंतर किरण राजला दुखापत तर नाही ना झाली? तो ठिक तर आहे ना? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. खरंतर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पूर्ण सत्य नाही. चला जाणून घेऊया या घटनेचे खरे स्वरूप काय आहे.

साऊथ अॅक्टरने सांगितला व्हिडीओ मागचे सत्य

कन्नड अभिनेता किरण राजने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता एक सोशल मीडिया पोस्ट करून स्वतः प्रेक्षकांना नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. किरण राजने सांगितले की खरेतर सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नव्हता आणि त्याला कोणतीही इजा झालेली नाही. किरण राजने सांगितले की ही संपूर्ण घटना लोकांनी चुकीच्या पद्धतीने समजून घेतली आहे. मुळात असे काहीच घडले नाही. हा व्हिडीओ परदेशातील आहे आणि तो एका झूमध्ये गेला असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. सिंहासोबत खेळत असताना हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Raj (@itskiranraj)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना किरण राज म्हणाला की, हा अटॅक नव्हता. सिंह खरेतर मला मिठी मारण्यासाठी आला होता. “मी या सिंहाला तेव्हापासून ओळखतो जेव्हा तो छोटा बाळ होता. मी त्याला मोठे होताना पाहिले आहे आणि आमचा बऱ्याच काळापासून संबंध आहे. मी यापूर्वीही त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत” असे किरण राज म्हणाला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
  • 61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडर 400 रुपयांनी कमी होणार, तर सब्सिडी वाढणार? Report समोर
  • नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
  • जरांगेंची शिंदेंवर एकेरी भाषा, शिवसेनेचे मंत्री देसाई भडकले, थेट म्हटले, आम्ही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in