• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

September 9, 2026 by admin Leave a Comment


दीड दशकाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे. भेगा पडल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या नागोठाणे उड्डाणपुलाबाबत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा पूल छोट्या वाहनांसाठी सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच समोर आलेल्या या व्हिडीओमुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नागोठाणे उड्डाणपुलाची पाहणी केली होती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी पूल सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. मात्र, पूल सुरू होण्यापूर्वीच त्याच्या सिमेंटच्या प्लेट्सना काचेच्या पट्ट्या लावल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ यश शेळके या तरुणाने शूट करून सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये पुलाच्या मजबुतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या काचेच्या पट्ट्यांचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला आहे, याबाबत प्रशासन किंवा संबंधित ठेकेदाराकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

‘Glass Tell-Tale’ पद्धतीने भेगांवर नजर

उड्डाणपुलावर दिसणाऱ्या काचेच्या पट्ट्यांचा संबंध ‘Glass Tell-Tale’ या पद्धतीशी असल्याचं दिसून येतं. बांधकामातील भेगा वाढत आहेत का किंवा त्या ठिकाणी हालचाल होत आहे का, हे तपासण्यासाठी ही साधी पद्धत वापरली जाते. यामध्ये भेगेच्या दोन्ही बाजूंना काचेची पातळ पट्टी मजबूत डिंक किंवा सिमेंटच्या साहाय्याने बसवली जाते. बांधकामाच्या संरचनेत हालचाल झाली आणि भेग रुंदावली, तर काच तुटते. त्यामुळे संबंधित ठिकाणी हालचाल झाल्याचं लक्षात येऊ शकतं. मात्र, ही पद्धत संपूर्ण संरचनात्मक सुरक्षिततेचा पर्याय नसून निरीक्षणासाठी वापरली जाणारी प्राथमिक पद्धत आहे.

गणेशोत्सवापूर्वी पूल सुरू होणार?

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. त्यामुळे नागोठाणे उड्डाणपूल सुरू झाल्यास मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची सखोल तांत्रिक आणि संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी होत आहे. काचेच्या पट्ट्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी त्याची संपूर्ण तांत्रिक आणि संरचनात्मक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कोकणवासियांकडून केली जातेय



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्…; व्हिडिओ व्हायरल
  • जरांगे तू कडू आहेस… बाथरूममध्ये जाऊन काय काय खाता? अजय महाराज बारस्करांचा हल्लाबोल
  • Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
  • Ganeshotsav: डीजे वादात श्रेयस तळपदे याचं मोठं वक्तव्य, असं काय बोलून गेला अभिनेता?
  • Rohit Pawar : राहुल नार्वेकर पक्षांतर बंदी कायदा अधिक प्रभावी बनवणार, त्यापेक्षा त्यांनी..रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in