
अकोला जिल्ह्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. हिरवीगार पिके आता सुकू लागली असून, यामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. विशेषतः सोयाबीनचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुबार पेरणी केली होती, मात्र पाऊस नसल्याने तेही पीक उगवले नाही.
सध्याच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बैलपोळा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पैशांअभावी यावर्षी त्यांना काळा पोळा साजरा करावा लागणार आहे. एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आमच्यावर जीव द्यायची पाळी आली आहे. ४०-४५ दिवस झाले, आमच्याकडे पाणी नाही. आज आमच्या गावामध्ये ४० दिवस झाले पाणी नाहीये. आमचं पीक असं झालं आहे, सर्व एकदम डब्बीची काडी लावून पेटण्यासारखं झालेलं आहे.”
या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले असून, त्यांच्यासमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले आहे.
Leave a Reply