
बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला सोमवारी सकाळी 3. 25 वाजता आग लागली. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या.
प्राथमिक माहितीनुसार, पॅजेंजरला आग ही सुरुवातीला इंजिनला लागली. त्यानंतर ट्रेनच्या तीन डब्यापर्यंत आग पसरली. ट्रेनला आग लागल्यानंतर हवेत धुराचे लोट पसरू लागले. आगीने भयानक रूप घेतल्यानंतर स्टेशनवर प्रवाशांची एकच धावाधाव झाली.
प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, ट्रेनला आग लागली. त्यानतंर काही वेळात या आगीने रौद्ररूप धारण केलं. या ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते.. आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी तातडीने ट्रेनमधून उतरण्यास सुरुवात केली. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती हाती आली आहे.
Leave a Reply