
भारत-श्रीलंकेत कोलंबो येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना ऋषभ पंतने शुबमन गिलच्या नावावर असलेला भारतीय रेकॉर्ड मोडला आहे. भारतीयांच्या यादीत पंत पुढे निघून गेला आहे. (Photo: PTI)
पंतने गिलला कुठल्या बाबतीत मागे टाकलय?.याचं उत्तर WTC Cycle मध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजाशी संबंधित आहे. ऋषभ पंत WTC मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज बनला आहे. (Photo: PTI)
पंत आणि गिल दोघे WTC मध्ये आतापर्यंत 42-42 सामने खेळले आहेत. पंत गिलच्या तुलनेत दोन इनिंग कमी खेळला आहे. पण ऋषभचे गिलच्या तुलनेत जास्त रन्स आहेत. गिलने 76 इनिंगमध्ये 2917 धावा केल्या आहेत. पंतने 74 इनिंगमध्ये 2948 धावा करुन गिलला मागे टाकलं. (Photo: PTI)
पंत आणि गिल नंतर WTC मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबतीत रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा आणि विराट कोहलीचा नंबर लागतो. रोहितने 2716 आणि जडेजाने 2675 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 2617 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)
रोहित आणि विराट आता टेस्ट मधून रिटायर झाले आहेत. जाडेजाकडे रोहितच्या पुढे जाण्याची संधी आहे. पंत आणि गिल यांच्यात WTC मध्ये धावांची स्पर्धा अजून इंटरेस्टिंग होईल. पंतने आघाडी जरुर घेतली आहे. पण गिल एका मोठ्या इनिंगनंतर अजून पुढे जाऊ शकतो. (Photo: PTI)




Leave a Reply