• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?

August 24, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण केल्याचे समोर आल्याने ही ॲक्शन घेण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका पॉश परिसरातील इमारतीवर थेट कारवाई होत असल्याने अनेकांची दाबे दणाणली आहेत. लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीवर मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अनेक मंत्री महोदय, आजी माजी आमदार आणि मोठ्या व्यावसायिकांचे फ्लॅट या इमारतीमध्ये आहेत.

अतिक्रमित जागेची किंमत 250 कोटींहून अधिक

अतिक्रमित जागेची बाजारातील किंमत 250 कोटींहून अधिक असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. या इमारतीच्या लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या टॉवरमध्ये 63 मजल्यांच्या तीन इमराती आहेत. आतापर्यंत दोन इमारतींना ओसी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याविषयीची तक्रार केली होती. त्यानंतर रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

या मंत्र्यांचा या इमारतीत फ्लॅट

मंत्री संजय राठोड, शीतल राठोड आणि समाधान सरवणकर यांच्या फ्लॅटचाही या इमारतीत समावेश आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भाडेतत्त्वावरील फ्लॅटवरही कारवाई होणार असल्याचे कळते. टॉवरमध्ये राजकीय नेते, अधिकारी आणि व्यावसायिकांचे फ्लॅट आहे. अतिक्रमित परिसरातील जागेचा दर प्रति चौरस फूट एक लाख रुपयांहून अधिक आहे. टॉवरमध्ये 63 मजल्यांच्या तीन इमारती आहेत. दोन इमारतींना ओसी मिळाले आहे. लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमित जागेची बाजारातील किंमत 250 कोटींहून अधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. जी-साऊथ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येत आहे. टॉवरमध्ये राजकीय नेते, अधिकारी आणि व्यावसायिकांचे फ्लॅट आहेत. अतिक्रमित परिसरातील जागेचा दर प्रति चौरस फूट एक लाख रुपयांहून अधिक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?
  • सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in