• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

August 24, 2026 by admin Leave a Comment


नीटची तयारी करणाऱ्या आणि एमएससी (Msc) चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या नृशंस हत्येमुळे अख्खं वाराणसी हादरलं. या हत्याप्रकरणाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जे भयानक सत्य समोर आलं, त्याने तर मोठी खळबळ उडाली. त्या विद्यार्निथीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची अधिकृत पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाली आहे. एवढंच नव्हे तर तिच्या डोक्यावर जड वस्तूने मारण्यात आलं होतं, तिचे पायही बांधून ठेवण्यात आले होते. मृत्यूपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचर करण्यात आले होते, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र शास्त्रीयदृष्ट्या त्याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने ते नमुने, फॉरेन्सिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवलेत.

पोस्टमॉर्टम अहवालातील या महत्त्वपूर्ण खुलाशानंतर पोलिसांनी हत्या आणि संभाव्य लैंगिक अत्याचाराच्या कलमांनुसार तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विवेक चौबे याला पकडण्यासाठी चार पछक स्थापन करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. चुनार, नियारडीह आणि चोलापूरसह आठ ठिकाणी छापे टाकण्यात ये आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात आहे.

दुसरीकडे लग्न ठरल्याने संतापला आरोपी

मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, आरोपी विवेक चौबे हा गेल्या काही काळापासून मुलीला ब्लॅकमेल करत होता. त्याने तिचा लग्नाच्या पोशाखातील फोटो काढून तो एडिट केला होता आणि दुसऱ्या कोणाशी लग्न केलस तर तो व्हायरल करेन अशी धमकी त्याने दिली होती.  त्या मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या इसमाशी ठरवलं होतं, फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार होता, मात्र हे समजताच आरोपी प्रचंड संतापला. नीट परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतो असं आमिष दाखवून आरोपीने त्या विद्यार्थीनीला 18 ऑगस्ट रोजी आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावलं. याच ठिकाणी तिची निर्घृण हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

बाथरूममध्ये आढळला मृतदेह

18 ऑगस्टला मृत विद्यार्थीनी घरातून बाहेर पडली, पण उशीर होऊनहीआलीच नाही, यामुळे घरचे काळजीत पडले. तिच्याशी बराच काळ संपर्कही होऊ शकला नाही, त्यामुळे काही वाईट-साईट घडलं नाही ना अशी शंका त्यांना आली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी सर्व्हिलन्सच्या मदतीने बच्छाव येथील आरोपीच्या भाड्याच्या खोलीचा शोध घेतला. मात्र ती खोली उघडल्यानंतर बाथरूममध्ये त्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्याने सगळेच हादरले. तिचा गळा चिरलेला होता, तर पाय बांधलेल्या अवस्थेत होते.

विशेष म्हणजे, ज्या घरात ही दुर्दैवी घटना घडली, त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेराही खराब असल्याचं पोलिसांना आढळलं.पोलिसांनी त्या विद्यार्थिनीचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातून काही क्लू मिळतो का हे तपासून पाहण्यात येणार आहे. मुलीच्या जाण्याने कोलमडून पडलेल्या कुटुंबियांनी साश्रूनयनांनी विद्यार्थीनीवर अंत्यसंस्कार केले. फरार आरोपीला लौकरात लौकर पकडून कठोर शिक्षा देऊ असा विश्वासस पोलिसांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
  • CJP Delhi Protest : ‘कॉकरोच’ पुन्हा दिल्लीत धडकणार, 5 सप्टेंबरला…सीजेपीची मोठी घोषणा; नवं आंदोलन पेटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in