• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू

August 24, 2026 by admin Leave a Comment


पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर येथे एका महिलेच्या मृत्यूने मोठी खळबळ माजली. टॉयलेट क्लीनर पाजून तिचा जीव घेण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा नावाच्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला जालंधर येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात आणि सासूविरोधात गुन्हा दाक केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पती आणि सासूने पाजलं टॉयलेट क्लीनर

मृत महिला नेहा ही उमंग बस्सी याची पत्नी होती. मात्र तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, नेहाचा पती आणि सासूने तिला टॉयलेट क्लीनर पाडलं. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. गंभीर अवस्थेत नेहाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आणि उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

दोन्ही आरोपी फरार

पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नेहाच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरू केला आहे. नेहाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा पती आणि सासू तिच्या 6 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन तेथून फरार झाले, असा आरोप कुटुंबियांनी केला. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधार्थ विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

नेहाच्या मृत्यूनंतर तिचे पोस्टमॉर्टम करून तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हवली करण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. एवढंच नव्हे तर नेहाचा पती, आरोपीचे दुसऱ्या एका तरुणीसोबत कथित संबंध आहेत, असा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते, मात्र त्याची अद्याप पुष्टी झाजालेली नाही.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in