
Salman Khan On Batwara : सनी देओल, प्रीति झिंटा, शबाना आजमी, अली फजल आणि करण देओल यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला ‘बंटवारा 1947’ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. बॉक्स नफीसवर या चित्रपटाची जादू फार चालली नाही, त्यामुळे कमाई देखील यथातथाच झाली. मात्र अनेकांना हा चित्रपट आवडला. इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ ची ‘बंटवारा 1947’ शी बॉक्स ऑफीसवर टक्कर झाली. त्यामुळे चित्रपटाल मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. चाहत्यांचा मोठा रिस्पॉन्स या चित्रपटाला मिळाला नसला तरीही बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना मात्र हा पिक्चर खूप आवडला. नुकतंच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. आता त्यानंतर बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खाननेही हा चित्रपट पाहिला.सलमाना हा चित्रपट खूप आवडल्याचं समजतंय, खुद्द सनी देओलचा मुलगा आणि ‘बंटवारा 1947’मध्ये काम करणारा अभिनेता करण देओलनेच ही गोष्ट उघड केली.
करण देओलने नुकत्याच एका चॅनेलला मुलाखत दिली, त्यावेळी तो सलमान खानबद्दलही बोलला. ‘ तो (आमच्या) कुटुंबावर खूप प्रेम करतो. तो खूप सपोर्टिव्ह आहे. नेहमीच आमच्या पाठिशी असतो. त्याचं प्रेम अगदी खरं आहे. तो खरंच एक ग्रेट माणूस आहे’ असं म्हणत करणने सलमानची स्तुती केली.
‘बंटवारा 1947’ पाहून काय म्हणाला सलमान ?
सलमान खानने ‘बंटवारा 1947’ पाहिला का, त्याची त्यावर काय प्रतिक्रिया होती ? असा सवाल यावेळी करणला विचारण्यात आला. ‘ हो, हो.. त्याने पाहिला ना. सलमान सरांनी पिक्चर पाहिला आणि त्यांनी बाबांना ) सनी देओल) कॉल केला. त्यांना तो पिक्चर खूप आवडला आणि बाबांचं कामही..’ असं करणने नमूद केलं.
‘बंटवारा 1947’ ची कमाई किती ?
सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला ‘बंटवारा 1947’ हा 14 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला. पण त्यासोबतच इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ देखील प्रदर्शित झाला. सनी देओलचा चित्रट इम्रान हाश्मीच्या चित्रपटावर भारी पडेल, असा सगळ्यांचा अंदाज होता, मात्र त्याच्या अगदी उलट झालं न राव ! राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेल्य या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ‘आवारापन 2’ ने मागे टाकलं.
रिलीज झाल्यानंतरच्य दुसऱ्या रविवारी ‘बंटवारा 1947’ने फक्त 1.30 कोटी कमावले, तर ‘आवारापन 2’ने 8.75 कोटींची दणदणीत कमाई केली. 10 दिवसांत ‘बंटवारा 1947’ ने जगभरात (ग्रॉस) 52.52 कमाले असून आवारापन 2’ ने आत्तापर्यंत 19 दिवसांत 192.80 कोटींची (ग्रॉस) धमाकेदार कमाई केली.
Leave a Reply